नवी दिल्ली – Jawan OTT Release: शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती स्टारर ‘जवान’ 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या सिनेमाच्या झटपट बुकिंगने बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन केलं आहे. त्यासोबतच या सिनेमाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. तसेच शाहरुखचे काही फॅन्स या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहात आहेत. किंग खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा आनंद आपल्या सोयीने आवडेल तिथे बसून घेण्याची या चाहत्यांची इच्छा आहे.
खरंच जवान ओटीटीवर येणार का? यासंबंधी इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, जवानच्या ओटीटी राइट्सच्या स्पर्धेत नेटफ्लिक्स सर्वात आघाडीवर आहे. मात्र नेटफ्लिक्सने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की या सिनेमाचे सॅटेलाईट राइट्स 250 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाईट राइट्ससोबतच संगीताच्या अधिकारांचाही समावेश आहे.
जवान प्रदर्शनाच्या 45 ते 60 दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच, दिवाळीच्या आधी अर्थात ऑक्टोबरच्या शेवटी ओटीटी घरी बसून पाहता येण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानचा आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा पठान अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाची निर्मिती YRF प्रोडक्शनची होती. तर SRK प्रोडक्शन हाऊस, रेड चिलीज एटंरनेटनमेंटने आतापर्यंत हाऊस की डार्लिंग्स, बेताल आणि बार्ड ऑफ ब्लड सारखे चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केले होते. तर ‘जवान’चे ऑनलाईन मीडिया पार्टनर नेटफ्लिक्स आहे. चित्रपटाच्या नामावलीतच त्याचा उल्लेख पाहायला मिळतो.
हेही वाचा : Jawan Movie Review : शाहरुख खानच्या स्टारडमवर ‘जवान’चा डोलारा
जवान फिल्मचे बजेट 300 कोटी पर्यंत आहे. तर प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशीच फिल्मने 200 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला त्यात आणखी भर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चित्रपटाला सर्वच शहरांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे शाहरुखने चित्रपट प्रदर्शनापूर्वी कोणत्या टीव्ही चॅनल्स, वृत्तवाहिन्या किंवा इतर माध्यमांना मुलाखत दिली नव्हती. प्रेक्षकांशी त्याने काही वेळांसाठी थेट संवाद मात्र साधला होता. त्यामुळे चित्रपटापूर्वी होणाऱ्या चर्चांना त्याने सपशेल नाकारलेले दिसले. हीच स्ट्रॅटिजी किंग खानने पठान प्रदर्शनापूर्वीही पाळली होती. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी SRK ने मुलाखत देण्याचे टाळलेले दिसत आहे.