घरक्रीडाआयसीसीच्या बैठकीत जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करणार

आयसीसीच्या बैठकीत जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करणार

Subscribe

त्यानुसार आयसीसीच्या बैठकींमध्ये यापुढे जय शहा हे बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत.

बीसीसीआयच्या सचिव पदी विराजमान झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यानुसार आयसीसीच्या बैठकींमध्ये यापुढे जय शहा हे बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत.

बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निर्णय

२३ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतला. याचवेळी जय शहा यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली. दरम्यान रविवारी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुलीने, आयसीसी बैठकीत जय शहा बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करेल असं स्पष्ट केलं.

- Advertisement -

म्हणून जय शहांकडे जबाबदारी

सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयची सुत्रं येण्याआधी, सर्वोच्च न्यायालयाची क्रिकेट प्रशासकीय समिती बीसीसीआयचा कारभार सांभाळत होती. त्यामुळे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आयसीसी बैठकीत बीसीसीआयची बाजू मांडत होते. मात्र संघटनेच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर आता ही जबाबदारी जय शहांकडे सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -