घरताज्या घडामोडीखडसेंपाठोपाठ भाजपला पडणार मोठं भगदाड; १०-१२ आमदार राष्ट्रवादीत जाणार!

खडसेंपाठोपाठ भाजपला पडणार मोठं भगदाड; १०-१२ आमदार राष्ट्रवादीत जाणार!

Subscribe

भाजपचे उत्तर महाराष्ट्रमधले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. मात्र, त्यापाठोपाठ ‘भाजपमधले वेगवेगळ्या मतदारसंघांतले १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे’, असा गौप्यस्फोट यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कोरोनाच्या काळात त्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका लागू नयेत, म्हणून हे आमदार काही काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

‘अन्याय होणारे इतरही आमदार संपर्कात!’

‘भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर मोठा अन्याय होत होता. अखेर त्यांनी मला काही वेळापूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे’, असं सांगितलं. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल, असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं. एकनाथ खडसे यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत त्यांच्यावर निष्ठा असणारे आणि त्यांच्याप्रमाणेच भाजपमध्ये अन्याय झालेले इतरही काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, असं जाहीर करून जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे पक्षप्रवेश लांबणार

अनेक आमदारांनी वैयक्तिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्य येणार आहेत. पण राज्यात कोरोनाचं संकट असताना या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये निवडणुका लागू करण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. या काळात निवडणुका परवडणार नाही. त्यामुळे या आमदारांची घटनात्मक अडचण होऊ नये, म्हणून पुढच्या काही काळात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आह, असं जयंत पाटील म्हणाले.


वाचा सविस्तर – २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, जयंत पाटलांनी केली घोषणा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -