यावेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्ण हाती आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य होईल – जयंत पाटील

यावेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्ण हाती आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. मात्र, निवडणूका घ्याव्यात असा आदेश झाल्याचे, मी आत्ताच वाचले. राज्य सरकारने OBC आरक्षण मीळावे यासाठी कायद्यात काही बदल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता.

Jayant Patil commented on Supreme Court Municipal Corporation and Municipalities decisions
Jayant Patil commented on Supreme Court Municipal Corporation and Municipalities decisions

मुंबई – ओबीसी आरक्षण प्रकरणी दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा आणि तात्काळ निवडणुका घ्या. असा आदेश सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी ज्या माहापालिकांची आणि नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया या आधी सुरू झाली त्याबाबत असावा असे ते म्हणाले.

यावेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्ण हाती आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. मात्र, निवडणूका घ्याव्यात असा आदेश झाल्याचे, मी आत्ताच वाचले. राज्य सरकारने OBC आरक्षण मीळावे यासाठी कायद्यात काही बदल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. तो या पूर्वी ज्या माहापालिका आणि नगरपालिकांची निवडणूक प्रकीया सुरू झाली त्याबाबत असल्याचे दिसते आहे. कोर्टाचा निकाल हातात आल्यानंतर त्यावर अधिक भाष्या करू असे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

काय आहे सुप्रिम कोर्टाचा निकाल –

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने निवडणुकीबाबत केलेल्या कायद्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेण्याचा कायदा केला. या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावर यालयाने दोन आठवड्यांत महापालिका आणि झेडपी निवडणुका जाहीर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.