घरमुंबईकोकण किनार्‍यांवर जेलीफिशचे आक्रमण ऐन मोसमात मासेमारी ठप्प

कोकण किनार्‍यांवर जेलीफिशचे आक्रमण ऐन मोसमात मासेमारी ठप्प

Subscribe

दसर्‍यानंतर अचानक कोकण समुद्र किनार्‍यांवर अत्यंत दाहक अशी जेली फिश आल्याने ऐन मासेमारी मोसमात कोकण किनारपट्टीवर मासेमारीचे संकट निर्माण झाले आहे. जेलीफिशमुळे उरण, अलिबाग, मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा, मजगाव, नांदगाव, श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, हरवीत, कुडगाव म्हसळा तालुक्यातील वाशी हवेली, तुरबाडी आदी बंदरातून मासेमारीस जाणार्‍या सुमारे ५०० नौकांची मासेमारी ठप्प झाल्याच्या वृत्ताला राजपुरी मत्सव्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला. येथील ज्येष्ठ मच्छीमार आणि होलसेल मासळी व्यावसायिक धनंजय गिधी यांनी बुधवारपासूनच्या संकटावर चिंता व्यक्त केली.

कोकणच्या किनार्‍यावर मासेमार्‍यांच्या जाळ्यात जेलिफिश मोठ्या प्रमाणात सापडत असून, या जेलिफिशच्या स्पर्शाने जवळपास २० मासेमार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शरीराला खाज येणे आणि डोळ्यांना स्पर्श झाल्यास डोळे लाल होतात. समुद्रात मिळणारी अन्य मासळी देखील जेली फिशपासून खूप दूर निघून जाते. जे मच्छीमार मासेमारीस गेले होते ते बहुतेक सर्वजण मासेमारी किनार्‍यांकडे तातडीने परतले आहेत. किनार्‍यावरील मासेमारी यामुळे ठप्प झाली असून किनार्‍यावरून मासेमारीसाठी गेलेल्या सुमारे ५०० मासेमारी नौका किनार्‍यावर परतल्या असल्याचे गिधी म्हणाले.

- Advertisement -

जेलिफिशचे आक्रमण धोकादायक असून, ते किती दिवस राहील हे सांगता येत नसल्याचे याचा नेम नसतो. नारळीपौर्णीमेपासून मासेमारीस सुरुवात झाली असली तरी अतिवृष्टी, वादळी वारे आणि विविध अडचणीमुळे मासेमारी सतत ठप्प होत होती. यामुळे मासेमारी करण्यास संधीच मिळाली नाही. करोडो रुपयांचा डिझेल परतावा महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मच्छिमारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेलिफिशचे आरिष्ट कोलंबी आणि मोठ्या मासळीच्या ऐन सिझनमध्ये जेलिफिशचे अरिष्ट आल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संकटामुळे ताज्या मासळीचा दुष्काळ निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. समुद्रातील मानवी प्रदूषण, पर्सनेट मासेमारी, आदी समस्या पारंपरिक मच्छिमारांपुढे आहेतच. अशातूनच मासेमारी करायची म्हणजे नुकसान आणि मोठे आव्हानच उभे ठाकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -