जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल ईडीच्या ताब्यात

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. जेट एअरवेज आणि गोयल यांची 'फेमा'अंतगर्त चौकशी सुरू आहे.

ED searches Jet Airways founder Naresh Goyal's premises in Delhi, Mumbai
'जेट' एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या पेडर रोड येथील घरी ईडीने छापा टाकून पथकाने त्यांना ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.


हेही वाचा – ‘जेट’ एअरवेजचे संस्थापक गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

ईडीने गोयल यांच्या पत्नी आणि मुलाची दोन ते तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गोयल यांच्या १९ बोगस कंपन्या असल्याचे तपासादरम्यान आढळून आले आहे. यामध्ये भारतात १४ कंपन्या आणि बाकीच्या पाच कंपन्या परदेशात आहेत. जेट एअरवेज आणि गोयल यांची ‘फेमा’अंतगर्त चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा ईडी दाखल करण्याचा विचार आहे. १२ वर्षांपासून जेटच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. तसेच आतापर्यंत गोयल यांची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे.


हेही वाचाटाटा करणार जेट एअरवेजची खरेदी