घरमुंबईजिओ २ची घोषणा; व्हॉईस कमांडवर चालणार फोन!

जिओ २ची घोषणा; व्हॉईस कमांडवर चालणार फोन!

Subscribe

तुमच्याकडे जिओचा फोन असेल तर तुम्हाला जीओ २ हा फोन फक्त ५०१ रुपयाला मिळणार आहे. जुना फोन देऊन हा फोन ५०१ रुपयात मिळण्याची ही ऑफर आहे. रिलायन्सने या फोनला 'मान्सून हंगामा' असे नाव दिले आहे

रिलायन्सने दोन वर्षांपूर्वी ‘जिओ’ लाँच केले आणि इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांना चांगलीच टक्कर दिली. मोफत हायस्पीड इंटरनेट देणारे जिओ अल्पावधीतच तरुणांमध्ये हिट झाले. आणि आता ते सुपरडुपर हिट होणार आहे. कारण, जिओकडून त्यांच्या ग्राहकांना आणखी काही खास मिळणार आहे. या संदर्भातील घोषणा आज जिओकडून करण्यात आली. नव्या फिचर्ससह रिलायन्सचा जिओ फोन २ बाजारात येणार असून स्वस्त आणि मस्त असा हा फोन फक्त तुमचं ऐकणार आहे. तुमच्या व्हॉईस कमांडवर हा फोन चालणार असून १५ ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरु होणार आहे.

असा आहे जिओ फोन २

तुमच्याकडे जिओचा फोन असेल तर तुम्हाला जीओ २ हा फोन फक्त ५०१ रुपयाला मिळणार आहे. जुना फोन देऊन हा फोन ५०१ रुपयात मिळण्याची ही ऑफर आहे. रिलायन्सने या फोनला ‘मान्सून हंगामा’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये सध्या सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉटसअॅप, फेसबुक आणि युट्युब हे अॅप चालणार आहेत. शिवाय व्हॉईस कमांडचा देखील फोनमध्ये समावेश असणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

फोनचे फीचर्स

  • ४ जी सपोर्ट
  • २.४ डिस्प्ले स्र्किन
  • २००० एमएएच बॅटरी
  • ५१२ रॅम/४ जीबी स्टोरेज एक्पांडेबल १२८ जीबीपर्यंत
  • २ मेगापिक्सल रेअर कॅमेरा, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • मोबाईलची किंमत- ३ हजार रुपये
  • पहिला जिओ फोन दिल्यास फोन ५०१ रुपयांना

आकाश, इशाने केली घोषणा

गुरुवारी रिलायन्स जीओची आज ४१ वी अॅन्युअल जनरल मीटिंग होती. या मीटिंग दरम्यान नव्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. आकाश आणि इशाने या नव्या फोनची घोषणा करत या नव्या फोनचे फीचर्सही सांगितले.

जीओचे गीगा फायबर

ब्रॉडबँडमध्येही रिलायन्सने पाऊल टाकले असून जीओ गीगा फायबरचे देखील आज अनावरण करण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गीगा फायबरचे अनावरण केले. इंटरनेटचे जाळे वाढत असून जिओच्या लाँचिंगपासून देशभरातील लोकांचा इंटरनेट वापर वाढला आहे. आता गीगा फायबरमुळे जिओला आणखी लोक जोडले जातील असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. गीगा फायबरसोबत ‘गीगा राउटर’, ‘गीगा टीवी सेट टॉप बॉक्स’ आणि ‘गीगा टीव्ही कॉलिंग’ची देखील घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -