HomeमुंबईJitendra Awhad : धनंजय मुंडेंच्या 'त्या' विधानानंतर जितेंद्र आव्हाड भडकले; चॅलेंज देत...

Jitendra Awhad : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानानंतर जितेंद्र आव्हाड भडकले; चॅलेंज देत म्हणाले, “खऱ्या बापाचं पोरगे असशील, तर…”

Subscribe

Jitendra Awhad Vs Dhananjay Munde : "हा अजित पवार यांचा दुसरा भाऊ आहे. काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारा.." असा हल्लाबोल आव्हाडांनी मुंडेंवर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लोकसभा निवडणूक झाली. आता विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप थांबवण्याचं नाव घेत नाहीत. शरद पवार यांचं सगळ्याचं जास्त नुकसान जितेंद्र आव्हाड यांनी केलं, असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. मुंडेंच्या टीकेनंतर संतापलेल्या आव्हाडांनी थेट त्यांना आव्हानच दिलं आहे.

डॉ. बियाणींचा खून कोणी आणि का केला? हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांचं उत्तर देतील, असं चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : राज ठाकरेंनी CM अन् श्रीकांत शिंदेंना दिला इशारा; म्हणाले, “आम्हालाही…”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “धनंजय मुंडेंबाबत बोलायचं झालं, तर मी खूप बोलू शकतो. फक्त त्याला विचारा बियाणींचा खून कुणी केला? हिंमत असेल आणि खऱ्या बापाचं पोरगे असेल, तर उत्तर देईल. बियाणींचा खून कोणी आणि का केला? हे धनंजय मुंडेंनी सांगावं. नाहीतर आमच्या बहीण आहेत, करूणा मुंडे… त्यांना बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो सगळं.”

“एकदा शरद पवारांनी सांगितलंय ना, ‘तुझी किती लफडी होती आणि त्यातून कसं बाहेर काढलंय.’ तसेच, मी शरद पवारांचं नुकसान मी केल्याचं धनंजय मुंडे म्हणतात. मी नुकसान केलं की नाही हे शरद पवार यांना विचारा,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

“हा अजित पवार यांचा दुसरा भाऊ आहे. काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारा… स्वत:च्या बहिणींना छळ-छळ-छळणारा…. आता बहिणींचे गोडवे जात आहे. पूर्वी काय केले मला माहिती आहे. माझे तोंड खूप घाणेरडे आहे,” असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.

हेही वाचा : ‘CM’च्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती, ठाकरेंना टोला लगावत शिंदे म्हणाले, “त्यात कपडे आहेत, युरीन पॉट…”