घरCORONA UPDATEधक्कादायक खुलासा! ३ दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक खुलासा! ३ दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

ठाणे राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा तीन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोना झाल्याच्या अनेक बातम्या माध्यमातून समोर आल्या, पण, माझी टेस्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. या सर्व गोंधळाता आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जितेंद्र आव्हाड तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा ठाणे मनपा राष्ट्रवादी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले ते ऐका?

‘तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण, तीन दिवसांत उपचार केल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली, त्या चाचणीत आव्हाडांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांच्या पुढील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ८ जणांना देखील कोरोना झाला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड क्वॉरंटाइनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर जनतेसमोर येण्याचे कारण म्हणजे, ते म्हणाले आहेत की, मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती आता करु शकणार नाही. याची आम्हाला खंत आहे’, असे आव्हाड म्हणाले. त्यामुळे आव्हाडांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे आमचीही चाचणी करुन आम्हाला देखील क्वॉरंटाइन करण्यात आले आहे’, असे मिलिंद पाटील म्हणाले.

- Advertisement -

Milind Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 13, 2020

क्वॉरंटाइननंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

क्वॉरंटाइन केल्यानंतर आव्हाडांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले की, ‘सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, असे असताना देखील प्रोटोकॉलनुसार मला आता किमान १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागणार आहे,’ अशी पहिली प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले. त्यामुळे आव्हाडाने खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वॉरंटाइन केले आहे. दरम्यान, ठाण्यातील कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यातील एका पत्रकाराचा कोनोचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

मी पुन्हा येईन

‘हो, काल माझी देखील कोव्हीड १९ ची टेस्ट करण्यात आली. त्यामुळे माझ्यासोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे’.

‘एका गोष्टीचे वाईट वाटते की, मी गरजूंना मुंब्रा भागात अन्नाची पाकिट वाटत होतो. माझ्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो. आता पुढील १४ दिवस ते शक्य नाही. मात्र, माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो. तसेच माझी पुन्हा ७ दिवसांनी टेस्ट होणार असून माझा तोही रिपोर्ट निगेटिव्ह येईल आणि मी पुन्हा येईन’, असेही ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – Coronavirus : आयसोलेटेड, होम क्वारनटाईन लोकांवर ‘सीव्हीडी ट्रॅकर’ची करडी नजर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -