Homeअर्थजगतJobs for Women : महिलांच्या बेरोजगारीत घट; पण 'ही' आहे चिंतेची बाब,...

Jobs for Women : महिलांच्या बेरोजगारीत घट; पण ‘ही’ आहे चिंतेची बाब, वाचा…

Subscribe

महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली असून हादर 8.6 टक्क्यांवर आलेला आहे. पण अजूनही बऱ्याच महिला या चांगल्या नोकरीच्या शोधात असल्याची माहिती समोर आलेली आहे.

मुंबई : आजच्या आधुनिक काळातील महिला या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. तर भारताचा विकास करायचा असेल तर निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या लोकांची आर्थिक बाजू ही बऱ्यापैकी मजबूत असली पाहिजे, असे जागतिक बँकेकडून हल्लीच एका निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. त्यातही भारताला प्रगतीच्या शिखरावर चढायचे असेल तर महिलांसाठी उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे लागेल असेही सांगण्यात आलेले आहे. जर भारतातल्या महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर भारताचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सध्या भारतातल्या शहरी भागांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या रोजगारात वाढ झालेली आहे. महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली असून हादर 8.6 टक्क्यांवर आलेला आहे. पण अजूनही बऱ्याच महिला या चांगल्या नोकरीच्या शोधात असल्याची माहिती समोर आलेली आहे. महिलांच्या बेरोजगारीचा दर जरी कमी झालेला असला तरी महिलांकडून चांगल्या नोकरीचा शोध घेण्यात येणे ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येते. (Jobs for Women: Reduction in unemployment of women; But women are looking for better jobs)

हेही वाचा – भिवंडी मनपाच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून होणार अंतिम निर्णय

महिलांच्या रोजगाराच्या संबंधीतील आकडेवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. मात्र, त्यांना नियमित रोजगार मिळत नाही. त्यामुळे या तीन महिन्यात पगारदार महिलांची संख्या 55 टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय पगारदार नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी झाली आहे, ती आता फक्त 47 टक्के उरली आहे. दरम्यान, या तीन महिन्यामध्ये अनियमित नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्या तेवढीच राहिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तीन महिन्यामध्ये शहरांमधील रोजगाराची आकडेवारी सारखीच राहिली आहे.

सरकारकडून दर तीन महिन्यांनी शहरी भागांमधील नोकऱ्या संदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात येत असते. याबाबतचा सर्वे सरकारकडून करण्यात येत असतो. यंदाच्या सर्वेक्षणामध्ये सात दिवसांमध्ये एक तासही काम मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला, असेच मानले जात आहे. बेरोजगारीच्या दरामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो. तर, कृषी क्षेत्रात जवळपास सर्वच नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे, तर इतर क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या घटली आहे. खरीप हंगामातील पेरण्या झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार वाढला आहे. मात्र, पेरणीचा हंगाम संपल्याने या नोकऱ्याही गायब होतील, ही निराशाजनक आणि चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांतील आकडेवारी ही धक्कादायक असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.