खुशखबर! नोकरी शोधताय? तर ही बातमी नक्की वाचा!

भारतीय टपाल खात्यात दहावी - बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांकरता भरती काढण्यात आली आहे.

Recruitment in iit for 700 open positions
आयटीआयमध्ये होणार ७०० जागांची भरती

नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय टपाल खात्यात दहावी – बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांकरता भरती काढण्यात आली आहे. यामध्ये चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे.

चालकांच्या १४ पदांसाठी नोकरभरती

भारतीय टपाल खात्यात चालकांच्या १४ पदांसाठी नोकरभरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. तर दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी १९ हजार ९०० प्रति महिना वेतन आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे.

क्रीडा कोट्यातून भरती

विशेष म्हणजे क्रीडा कोट्यातून देखील भरती निघणार आहे. यामध्ये ज्युनिअर अकाउंटंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली असून पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे.


हेही वाचा – आठ दिवसांच्या वादानंतर अखेर इंदुरीकर महाराजांची दिलगिरी