घरताज्या घडामोडीघटनाक्रम : एंटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आली कशी ? मुंबई पोलिसांकडूनच उलगडा

घटनाक्रम : एंटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आली कशी ? मुंबई पोलिसांकडूनच उलगडा

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ मुंबईत आली कशी याबाबतचा घटनाक्रम मुंबई पोलिसांनी स्पष्ट केला आहे. या प्रकरणातील संशयित स्कॉर्पिओ कार ठाण्यातून दक्षिण मुंबईत कशी दाखल झाली या संपुर्ण गोष्टीचा उलघडा मुंबई पोलिस दलातील सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या संपुर्ण घटनेत एक महिन्यापासून कारस्थान रचण्यात आल्याची बाब स्पषट केली आहे. स्कॉर्पिओसोबतच इनोव्हा गाडीचीही नंबर प्लेट चुकीची होती. तसेच अतिशय धुर्तपणे गाडीच्या सीटवर स्फोटके आणि चिठ्ठी सोडल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. या संपुर्ण घटनेतील दोन्ही गाड्या एकमेकांना कुठे मिळाल्या, तसेच किती वाजता कुठे कुठे ही गाडी होती या संपुर्ण घटनेचा तपास मुंबई पोलिसांनी ठाण्यापासून ते दक्षिण मुंबईत सीसीटीव्हीचा वापर करून केला आहे. (Joint CP of Mumbai police milind bharambe explained timeline about parked explosive containing scorpio ouside antelia)

scorpio

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी FIR दाखल

letter to mukesh ambani
मुकेश अंबानींना धमकीसाठी स्कॉर्पिओ ठेवण्यात आलेले धमकीचे पत्र

मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके : गृहमंत्री, मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

कसा आहे अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करण्यापर्यंतचा घटनाक्रम ?

१. संशयित इनोव्हा कार ही मुंबईत मध्यरात्री १:२० वा. आली. प्रियदर्शनीजवळ स्फोटकांनी भरलेली कार ही इनोव्हाला भेटली.

२. इनोव्हा ठाण्यातून येताना दिसत आहे. राञी २:१८ ला यांनी गाडी पार्क केली त्यानंतर इनोव्हा कार पहाटे ३ वा मुलुंड टोल नाका जवळील CCTV  दिसून आली
प्रियदर्शनीजवळ स्काँर्पिओ मिळाली.

३. दुसऱ्या इनोव्हा गाडीचाही नंबर प्लेट फेक आहे. दोन्ही गाड्या दादर शिंदेवाडी, वरळी, हाजीअली, भायखळा खडापार्सी येथून फिरून अंटेलियाजवळ पार्क करण्यात आली.

४. प्रियदर्शनीजवळ स्काँर्पिओ मिळाली.

५. दुसऱ्या इनोव्हा गाडीचाही नंबर प्लेट फेक आहे. दोन्ही गाड्या दादर शिंदेवाडी, वरळी, हाजीअली, भायखळा खडापार्सी येथून फिरून अंटेलियाजवळ पार्क करण्यात आली.

Mukesh ambani

६. गाडीत सापडलेल्या सर्व नंबर प्लेट अंबानी कुटुंबियांच्या ताफ्याशी संबधित आहेत. धमकीचे पत्रही एका शहाण़्या व्यक्तीने मुद्दाम  लिहिल्यासारखे वाटते.

७. सापडलेल्या जिलेटिनद्वारे कार स्फोट होईल इतकीच त्याची क्षमता होती. गाडीच्या सीटवरचं हे जिलेटीन ठेवले होते.

८. स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर हा निता अंबानी यांच्या ताफ्यात सर्वात पुढे चालणाऱ्या गाडीचा नंबर आहे़.

९.  संशयित गाडी सुरक्षा रक्षकांच्या मँनेजरला दिसली.

१०. नंबरप्लेटमुळे त्या गाडीवर संशय बळावला

११. NIA  च्या पथकानेही मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असून आम्ही एकत्रितरीत्या तपास करत आहेत.

bmb

१२. गाडी कोविडमुळे एक वर्ष उभी होती. ती विकायची होती म्हणून गाडी चालवत विक्रोळीपर्यंत आणली. माञ १७ फेब्रुवारीला ओपेरा हाऊसला निघालेले असतानाच गाडीची स्टेरिंग जाम झाली आणि गाडी पार्क केली.

१३.  या तपासासाठी ८ ते १०  पथक निवडली आहेत.

१४. दिवस राञ हा तपास विभागून सुरू आहे.

१५.  हा कट महिनाभरापासून आखला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही

स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, February 26, 2021

 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमुळे एकच खळबळ गुरूवारी उडाली होती. या कारची मालकी कोणाची याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. कारण मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातील कारच्या क्रमांकाचा दुरूपयोग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले होते. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी या कारच्या मालकाचा कसून तपास सुरू केला होता. मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसायिक असून ठाण्यातील रहिवासी आहेत. आपल्या गाडीचे स्टेअरींग खराब झाल्याने मी माझी गाडी विक्रोळीला पार्क केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्कॉर्पिओ गाडीचा मालक असलेला मनसुख हिरेन या व्यक्तीने आज शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रांचकडे या संपुर्ण घटनेची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु कार्यालयात सचिन वाझे यांच्याकडे याबाबतचा जबाब दिला आहे. माझी गाडी १७ तारखेला खराब झाल्याने मी ती गाडी विक्रोळी येथे पार्क करून निघालो. त्यानंतर गाडी हरवल्यासाठीची तक्रार मी मुंबई पोलिस ठाण्यात दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई पोलिसांनीही प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीमध्ये स्पष्ट केले आहे की, काही दिवसांपूर्वीच ही कार चोरी केल्याची माहिती आहे. या कारचा चेसीचा क्रमांक डॅमेज करण्यात आला आहे. पण पोलिसांनी या कारची मूळ ओळख तसेच मूळ मालक शोधला असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते.

हे ही वाचा – पहा व्हिडिओ : स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मुंबई क्राईम ब्रॅंचसमोर हजर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -