KCR meets Sharad Pawar : भाजपविरोधी आघाडीची मोट बारामतीत ? केसीआर – शरद पवार भेटीत प्रस्ताव

KCR sharad pawar meet

देशात स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षानंतरही काही गोष्टीत बदल झालेला नाही. त्यामुळेच देशात नवी अजेंडा घेऊन परिवर्तन घडवणार असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सील्वर ओक येथील निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर ते प्रसारमाध्यांशी बोलत होते. शरद पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. तसेच एकत्र काम करण्याची गरज असल्याच्या मतावर सहमती झाली आहे. यापुढे देशातील अन्य लोकांसोबतही चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. (K Chandrasekhar Rao hints third front meeting against bjp at baramati after meet Sharad pawar at mumbai)

देशात भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बारामतीतून प्रस्ताव आहे. त्यामुळे समविचार पक्ष बारामतीतही भेटू शकतो असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. सर्वांशी चर्चा करून एक बैठक होईल, जे खांद्याला खांदा मिळवून काम करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व लोकांशी बोलणी करून मार्ग करणार असल्याचेही राव म्हणाले. एक अजेंडा देशासमोर लवकरच मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीय पक्ष एकत्र येतो राजकीय लाईनवर चर्चा होत असते. पण आजची बैठक वेगळी होती. देशातील मुख्य समस्यांमध्ये गरीबी, भूकमारी, आत्महत्या, बेरोजगारी रस्ता काढण्यासाठीची आज बैठक झाली. या समस्यांवर काय करायला हवे यावरही चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही, पण विकासाचे प्रश्न महत्वाचे असल्याने या विषयावर चर्चा झाली. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी देशपातळीवर सर्वाधिक वेगळ्या पद्धतीची पावले उचलण्यात आली आहेत. एक मार्ग देशाला तेलंगणा राज्याने दाखवला असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. विकास, विकास आणि विकास याच विषयावर आज चर्चा झाली. बेरोजगारी आणि गरीबी सुटका करण्यासाठी पूर्ण देशात माहोल तयार करणे गरजेचे असल्याचे आणि त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. देशात तिसऱ्या आघाडीबाबतचा यापुढचा कार्यक्रम कधी ? कुठे ? हे निश्चित करणार असल्याचेही ते म्हणाले.


KCR meets Uddhav thacekeray : सुडाच्या राजकारणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन, म्हणाले…