‘कबीर सिंग’ वरुन डॉक्टरांमध्ये नाराजी; डॉक्टरांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह

डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्य मंत्री, सेंसर बोर्डसह अनेक मंत्र्यांनाही पत्र लिहून तात्काळ या सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदी आणावी अशी मागणी

शाहिद कपूरच्या नुकत्याच आलेल्या कबीर सिंग या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली असून आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरही चांगला डल्ला मारला आहे. पण, मुंबईतील एका डॉक्टरने या सिनेमावर आक्षेप घेतला. या आधी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना रनौतचा चित्रपट ‘ मेंटल है क्या ‘ या सिनेमाच्या नावावरुनही मानसोपचारतज्ज्ञांनी आक्षेप घेत विरोध केला होता. त्यानंतर आता पुन्हा कबीर सिंह हा सिनेमा डॉक्टरांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हेही वाचा – ‘उरी’नंतर बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’चा धुमाकूळ

सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदीची मागणी

याविषयी डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्य मंत्री, सेंसर बोर्डसह अनेक मंत्र्यांनाही पत्र लिहून तात्काळ या सिनेमाच्या स्क्रिनिंगवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.

पत्र लिहिणारे मुंबईतील मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितलं की, डॉ. कबीर सिंग या सिनेमात डॉ. कबीर सिंग या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. यामुळे डॉक्टरांच्या प्रतिमा मलीन होऊन संपूर्ण मेडिकल क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे.

सिनेमांचा तरुणांवर परिणाम होत असल्याने आक्षेप

सिनेमात डॉ.कबीर सिंग यांना अनेकदा धूम्रपान , मद्यपान, नशा करताना जास्त हिंसक असलं दाखवलं आहे. आपल्या समाजावर सिनेमांचा अधिक प्रभाव पडतो. अशा प्रकारच्या सिनेमा पाहून लोकांपेक्षा तरुणांवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे हा आक्षेप घेण्यात आला आहे.