घरमुंबई'पुराची नुकसान भरपाई हवी'; कल्याण एपीएमसीचे तहसीलदारांकडे निवेदन

‘पुराची नुकसान भरपाई हवी’; कल्याण एपीएमसीचे तहसीलदारांकडे निवेदन

Subscribe

मुसळधार पावसामुळे कल्याण एपीएमसी मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे शासनस्तरावावर भरपाई मिळावी, अशी मागणी एपीएमसी मार्केटचे सभापती कपिल थळे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्यांचीच दाणादाण उडवून दिली. दरम्यान, कल्याण कृषी बाजार समितीच्या आवारातील अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला तसेच फुल व्यापाराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी सोमवारी कल्याण तालुक्याचे तहसीलदार आकडे यांच्याकडे केली.

सभापतींनी तहसीलदारांना दिले निवदेन

मुसळधार पावसामुळे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरात आदी परिसरात पाणी शिरल्याने पूरस्थितीचा उद्भवली होती. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी भरल्याने इथल्या व्यापाऱ्यांचे अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला तसेच फुल व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शासनस्तरावरून भरपाई मिळावी, अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आहे. त्यासाठी सोमवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी तहसीलदार आकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे संचालक मोहनशेठ नाईक, संचालक धोंडिभाऊ (बाबाजी) पोखरकर, ज्येष्ठ संचालक शंकर आव्हाड, संचालक अर्जुनबुवा चौधरी, संचालक दत्ताशेठ गायकवाड आणि बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी आदी उपस्थितीत होते.

- Advertisement -

हेही वाचा – पुरामुळे कल्याणामध्ये शेकडो संसार उघडयावर; २६ जुलैची कटू आठवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -