मुंबई – कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला त्रास देणारा आणि घरात घुसून मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लावर अखेर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. कल्याण मधील हायप्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणात अखेर या मुजोर एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला याला निलंबित करण्यात आले आहे.
कल्याण येथील योगीधाम परिसरातील उच्चभ्रू परिसरातील सोसायटीत गुरूवारी किरकोळ कारणावरून अभिजीत आणि धीरज देशमुख कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. बाहेरुन गुंड आणून मारहाण करण्यात आली होती. यात अभिजीत देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांची तक्रार पोलिसांनी कित्येक तास स्वीकारली नाही. या सर्व प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
हिवाळी अधिवेशनात पडसाद
महाराष्ट्रात राहून मराठी माणसांवर दादागिरी, शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. माजुरड्यांचा माज उतरवणार, मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अखिलेश शुक्ला याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मराहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेतल्यानंतर तो स्वतःपोलिसांच्या समोर आला. अखिलेश शुक्सालने आत्मसमर्पण केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. अखिलेश शुक्लाने आणल्या गुंडापैकी किती जण फरार आहे हे समजू शकलेले नाही.
त्याआधी अखिलेश शुक्लाने स्वतःच व्हिडीओ शूट करत माझ्याच पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला. मराठी माणसाचा अपमान आणि मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्यांचं निलंबन करून त्याचा माज उतरवण्यास सुरुवात केली आहे. मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर मनसेनेही सरकारला इशारा दिला.
हेही वाचा : Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण; तीन दिवसानंतर धनंजय मुंडे आले समोर
Edited by – Unmesh Khandale