घरCORONA UPDATECoronaVirus : कल्याण-डोंबिवली नव्या १२ कोरोना रूग्णांची भर

CoronaVirus : कल्याण-डोंबिवली नव्या १२ कोरोना रूग्णांची भर

Subscribe

डोंबिवलीतील ८ रूग्ण, कल्याणचे ३ आणि आंबिवली येथील १ रूग्णाचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत बुधवारी नवीन १२ रूग्ण आढळून आले. यात सर्वाधिक डोंबिवलीतील ८ रूग्ण, कल्याणचे ३ आणि आंबिवली येथील १ रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ९७ वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांशी संपर्क आलेला आहे. यामध्ये एका पोलीसाचा समावेश आहेत, तसेच डोंबिवली पश्चिमेतील आणि आंबिवली येथील रूग्ण हा ठाणे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या रूग्णाच्या सहवासात आलेला आहे. तसेच एका शासकीय रूग्णालयात काम करणाऱ्या नर्सचाही समावेश आहे. आतापर्यंत ३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६१ रूग्ण उपचार घेत आहेत. २९ रूग्णांवर निऑन हॉस्पीटलमध्ये तर ११ रूग्णांवर शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित रूग्ण हे मुंबई येथील विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाने सांगितले. मात्र कल्याण- डोंबिवली शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली असून, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -