घरठाणेकल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींची उचलबांगडी; भाऊसाहेब दांगडे नवे आयुक्त

कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींची उचलबांगडी; भाऊसाहेब दांगडे नवे आयुक्त

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी विजय सूर्यवंशी यांची नवीन नियुक्ती न करताच वेटिंग वर ठेवत कल्याण पालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली केली आहे.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची उचल बांगडी करण्यात आली असून त्यांना अद्याप कोणतीही नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. तर सूर्यवंशी यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे यापूर्वी नगर विकास मंत्री होते त्यामुळे राज्यातील महापालिका नगरपरिषदा यांच्या कारभारावर त्यांचे नियंत्रण होते. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे होम पीच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सन 2011 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

विजय सूर्यवंशी यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीवर मुख्यमंत्री हे काहीसे नाराज असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती 15 जुलैपासून सूर्यवंशी हे मसुरी येथे पुढील प्रशिक्षणासाठी जाणार होते त्यामुळे त्यांची बदली होणार ही चर्चा होतीच मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी विजय सूर्यवंशी यांची नवीन नियुक्ती न करताच वेटिंग वर ठेवत कल्याण पालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली केली आहे.

सूर्यवंशी हे ज्येष्ठ सनदी अधिकारी असो त्यांनी यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे सूर्यवंशी यांना ठाणे जिल्हाधिकारी होण्यात अधिक स्वारस्य होते मात्र आजच्या निघालेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये अद्याप तरी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.


महागाईचा भडका! सीएनजी चार तर पीएनजी तीन रुपयांनी महागला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -