घरमुंबईCorona: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन जाहीर

Corona: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन जाहीर

Subscribe

मेडिकल रुग्णालये वगळता जीवनावश्यक दुकाने बंद , होम डिलिव्हरीला मुभा

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णालये व मेडिकल दुकाने वगळता इतर दुकानांना बंदी घातली आहे. होम डिलिव्हरी करणा-या दुकानदारांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून वाहनेही जप्त केली जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

होम डिलिव्हरीला मुभा

महापालिका आयुक्तांनीही पालिका क्षेत्रातील रुग्णालये व मेडिकल दुकाने वगळता किरणामाल व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी पाच ते दुपारी दोन पर्यंत होम डिलिव्हरी करतील अशी दुकाने सुरू ठेवण्याचेही आदेश देण्यात आले असून, या आदेशाचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे . तसेच भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी एका जागेवर बसून विक्री न करता हातगाडीवर फिरून विक्री करावी, त्याच बरोबर पालिका क्षेत्रात दुचाकी अत्यावश्यक सेवा वगळता इतर चारचाकी वाहनबंदी करण्यात आली असून जी वाहने आढळतील त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .

- Advertisement -

कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता त्यावर आळा घालण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. यासाठीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकाही व्यक्तीने किराणा माल, भाजीपाला, दूध-फळे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडू नये. संबंधित वस्तू दुकानदारांनी होम डिलिव्हरीद्वारे पोहचवण्याचे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि गाड्या जप्त करण्याच्या इशारा ही त्यांनी दिला आहे.


कोरोनामुळे सैनिकांची शिस्त बिघडली? आर्मी कट करायला न्हावीच मिळेना!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -