घरक्राइमKalyan Firing : महेश गायकवाड यांच्यावर गोळीबाराआधी 'त्याच' पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Kalyan Firing : महेश गायकवाड यांच्यावर गोळीबाराआधी ‘त्याच’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Subscribe

भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून, त्यांनी मात्र अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. तर इकडे महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. असे असतानाच आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील उल्हास नगर भागातील हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे आता शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बिल्डरने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे गोळीबार प्रकरणाच्या आधीच महेश गायकवाड यांच्यावर त्याच हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे शुक्रवारीच (2 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तेव्हा महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही एवढी गुप्तता का बाळगण्यात आली याबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. (Kalyan Firing A case was filed against Mahesh Gaikwad in the same police station before the firing)

शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती होऊन सत्ता स्थापन करण्यात आली. याच डबल इंजिन सरकारला दादांच्या राष्ट्रवादीचीही जोड मिळाली. असे असतानाच राज्यात कोण पॉवरफुल्ल असा वाद कधी चर्चांमधून तर अधून-मधून वर्तमान पत्रांतील जाहिरातीतून उघड होत असतो. अशातच भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून, त्यांनी मात्र अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. तर इकडे महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. असे असतानाच आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि तोही गोळीबार प्रकरणाच्या घटने आधीच. तेव्हा गोळीबार प्रकरणाचं नेमकं कारण कुठे आणि कसं दडलंय ? याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

- Advertisement -

काय आहे नेमंक प्रकरण?

राज्यभर चर्चेत असलेलं उल्हासनगर गोळीबार प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जात आहे. कारण, आताच मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख यांच्या तक्रारीवरून महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल करणारे बांधकाम व्यावसायिक हे व्हर्टेक्स स्काय व्हिला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी आहे. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड या बांधकाम कंपनीशी संबंधित आहे, असे समजते. या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर 70 जण यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांच्या मुलाकडून पक्षात गुंडांची भरती! विजय वडेट्टीवार यांची टीका

- Advertisement -

चार हजार जणांकडे बंदुकीचे परवाने

ठाणे जिल्ह्यातील ज्यांच्याकडे बंदुकीचे लायसन्स आहे त्याची पडताळणी करण्याचा आदेश शासनाने दिले आहेत. राज्य सरकारने ठाणे पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4 हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणी, बिल्डर आणि समाजसेवक हे लोक बंदुकीचं लायसन्स मिळवण्यात अग्रस्थानी आहेत. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर आता ठाणे पोलीस जिल्ह्यातील सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत, जर आवश्यकता नसेल तर लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे.

यामुळे करण्यात आला महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार जितेंद्र पारीख, भागीदार प्रमोद रंका यांचे व्दारली येथे भागीदारी पध्दतीने जमीन विकसित, गृह प्रकल्प विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे. खरेदी विक्री व्यवहाराने ही जमीन भागीदारांनी कब्ज्यात घेतली आहे. या जागेत व्दारली गावातील 70 ग्रामस्थांसह शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आपल्या साथीदारांसह तक्रारदारांच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदा घुसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तर तेथील सुरक्षा रक्षकांनी या मंडळींना रोखले असता त्यास दाद न देता त्यांनी तक्रारदारांच्या जागेत जबरदस्तीने प्रवेश केला. या जागेवर आमचा कब्जा असल्याचे सांगून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगारांना दमदाटी, शिवागीळ करून तेथील काम बंद पाडले. बांधकामाच्या ठिकाणी बांधलेली संरक्षित भिंत जमावाने तोडली. बेकायदा जमाव जमवून तक्रारदार जितेंद्र पारीख यांच्या जागेत घुसखोरी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -