घरमुंबईकल्याण स्थानकातील स्वच्छतेवर मुंबईहून कंट्रोल

कल्याण स्थानकातील स्वच्छतेवर मुंबईहून कंट्रोल

Subscribe

केंद्र सरकारच्या पाहाणीत सर्वाधिक अस्वच्छ स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानक दुसर्‍या क्रमांकावर आल्यानंतर अखेरीस रेल्वे व्यवस्थापनास जाग आली असून, स्थानकाच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची संख्या तिप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पाहाणीत सर्वाधिक अस्वच्छ स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानक दुसर्‍या क्रमांकावर आल्यानंतर अखेरीस रेल्वे व्यवस्थापनास जाग आली असून, स्थानकाच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची संख्या तिप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या ४८ वरून थेट १६० होणार आहे. तसेच, स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी दर १० दिवसांनी मुंबई विभागीय कार्यालयातून एक वरिष्ठ अधिकारी कल्याण स्थानकाला भेट देऊन पाहाणी करणार आहे. त्यामुळे आता कल्याण रेल्वे स्थानकातील स्वच्छतेवर मुंबईहूनच कंट्रोल राहणार आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी कल्याण व शहाड स्थानकांची पाहाणी केली. त्यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत तातडीने पावले उचलण्याची मागणी शिंदे यांनी केली असता स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या येत्या १० दिवसांत तिप्पट करण्यात येईल, असे जैन यांनी सांगितले. तसेच कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. प्रवाशांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची, विशेषतः महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. ७ तसेच कल्याण (पू.) स्कायवॉकवर स्वच्छतागृह बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. जैन यांनी ती तात्काळ मान्य केली. यानुसार प्लॅटफॉर्म क्र. ७ वर, तसेच स्कायवॉकच्या दोन रॅँपच्या जंक्शनपाशी किंवा सध्या काम सुरू असलेला रँप जिथे उतरतो, तिथे कायमस्वरुपी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.

- Advertisement -

गर्दुल्ले फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई
कल्याण स्थानकात गर्दुल्ले आणि फेरिवाल्यांचा अतोनात त्रास प्रवाशांना सोसावा लागतो याकडे लक्ष वेधल्यानंतर त्यावर रेल्वे, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पोलिस यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकाकडून सातत्याने कारवाई केली जाईल आणि तिन्ही यंत्रणांच्या नियमित बैठकाही होतील, असे जैन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

शहाड स्थानकात नवीन पादचारी पूल बांधणार
शहाड स्थानकाचीही पाहाणी करण्यात आली. मुंबई दिशेकडील पादचारी पुल अतिशय अरुंद असल्याने तो पुल तोडून त्या ठिकाणी नवा रुंद पुल बांधण्यात येणार असल्याची माहिती जैन यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत या कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे, कसारा दिशेलाही नवा पादचारी पुल बांधण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांना दोन्ही प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर्स लावण्यात येणार आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्र. २ वरही स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली. त्यावर तातडीची बाब म्हणून तात्पुरत्या स्वरुपात पोटा केबिनचे स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश जैन यांनी अधिकार्‍यांना दिले आणि कायमस्वरुपी स्वच्छतागृहाचा प्रस्ताव तयार करून लगेचच मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -