घरमुंबईधक्कादायक! कल्याणमध्ये उच्चशिक्षित मुलानेच केली आईची हत्या

धक्कादायक! कल्याणमध्ये उच्चशिक्षित मुलानेच केली आईची हत्या

Subscribe

पोटच्या मुलानेच वृध्द आईची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रूकसाना मेहमूद खान (वय ६२) असे मृत आईचे नाव असून, अमान हसन याला बाजारपेठ पोलिसांनी या कृत्यासाठी अटक केली आहे.

पोटच्या मुलानेच वृध्द आईची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रूकसाना मेहमूद खान (वय ६२) असे मृत आईचे नाव असून, अमान हसन याला बाजारपेठ पोलिसांनी या कृत्यासाठी अटक केली आहे. विशेष म्हणजे अमान हा उच्चशिक्षित असून तो बीएससी करत आहे. कल्याण पश्चिमेतील भोईवाडा परिसरातील गफूर पॅलेस येथे हे कुटुंबिय राहतात. अमान हा कल्याणमधील एका कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तसेच पार्टटाइम कामही करतो. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला आहे.

मुलाने उचलले टोकाचे पाऊल 

काही दिवसांपासून अमान हा कामधंदा करत नसल्याने घरातच बसून होता. त्यावरून पत्नी आणि त्याच्यात नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली हेाती. पत्नीला घरी आणण्यासाठी तो नेहमी आईकडे तगादा लावत होता. बुधवारीही त्याने पत्नी घरी कधी येणार यावरून आईशी भांडत गेले. पाऊस जास्त असल्याने आज येणार नाही, असे आई त्याला समजावत होती. यावरून रागावलेल्या अमानने आईशी भांडण करत तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. याचवेळी त्याने तिच्या डोक्यात लाेखंडी वस्तूचा प्रहार केल्याने ती रक्ताच्या थारोळयात कोसळली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अमानच्या भितीने त्याची वहिनी व दोन पुतणे यांनीही घराबाहेर पळ काढला. भांडणाचा आवाज झाल्याने शेजारचे रहिवाशी जमा झाले. मात्र अमानने दरवाजा बंद केला होता. अखेर बाजारपेठ पेालिसांना बोलावण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अमानला अटक केली. याप्रकरणी अमान विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -