घरमुंबईकांदिवलीत भिंत कोसळून एकाच मृत्यू; १ जखमी

कांदिवलीत भिंत कोसळून एकाच मृत्यू; १ जखमी

Subscribe

कांदिवलीतील इंदिरा नगर या ठिकाणी लालजी पाडा येथे असलेल्या एका इमारतीच्या घरातील काही भाग कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आहे.

कांदिवलीमध्ये इमारतीच्या घराचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

असा घडला अपघात

कांदिवली पश्चिम येथील इंदिरा नगर या ठिकाणी लालजी पाडा येेथे असलेल्या एका इमारतीच्या घरातील काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ७ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये रमेश मिंग (१८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमित लकडा (२८) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. तौफिक यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -