घरCORONA UPDATEकांदिवलीतील जैन मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर; १०० बेडची सोय

कांदिवलीतील जैन मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर; १०० बेडची सोय

Subscribe

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड्स देखील अपुरे पडू लागले आहेत. यामुळे कांदिवलीतील जैन मंदिराने पुढाकार घेत मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर केलं आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पाच मजली पावन धाम हे जैन मंदिर पूर्णपणे कोविड सेंटर करण्यात आलं आहे. यात १०० ऑक्सिजन बेड असणार आहेत.

मुंबईत ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. बेड न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी जैन मंदिराचे रूपांतर कोविड केंद्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं मंदिर प्रशासनाने सांगितलं. आमच्या जैन मंदिरात एक अभ्यास कक्ष, ध्यान कक्ष, स्वयंपाकघर आणि इतर अनेक खोल्या आहेत. येथे बरेच धार्मिक उपक्रम नियमितपणे सुरु असतात. परंतु आता आम्ही त्याचं पूर्णपणे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करीत आहोत, असं मंदिर प्रशासनाशी संबंधित प्रदीप मेहता यांनी सांगितलं.

- Advertisement -

तांत्रिक सेवा जी काही आहे, ती उपलब्ध करण्यात आली असून ही सुविधा एक-दोन दिवसात सुरू होईल, असं मेहता म्हणाले. “आमच्याकडे एक्स-रे मशीन आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन उपकरणे देखील आहेत. शिखर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी येथे सेवा देणार आहेत, असं गुप्ता यांनी सांगितलं.

प्रतिदिन तीन हजार रुपये दराने बेड उपलब्ध असतील. या शुल्कामध्ये बेड, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय उपचार, औषधे, डॉक्टरची फी, भोजन आणि इतर गोष्टींचा समावेश असेल. मेहता यांच्या मते, मंदिरातील वातावरणामुळे रुग्ण लवकर बरे होतील.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -