शिवसेनेच्या दबावामुळेच जावेद अख्तर यांनी दाखल केला खटला – कंगणाचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या दबावाखाली येऊनच जावेद अख्तर यांनी माझ्यावर खटला दाखल केला असा गंभीर आरोप तिने केला आहे. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा कंगणा विरुद्ध शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Kangana Ranaut Gives Reasons Why South Superstars Are Such A Rage Says Shouldnt Allow Bollywood To Corrupt Them
बॉलीवूडकरांपासून सावध राहा, कंगनाचा साऊथ स्टार्सला इशारा

सुप्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौतविरोधात मानहानिचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणाची आज अंधेरी कोर्टात सुनावणी होती. यामुळे कंगणा कोर्टात हजर झाली होती. सुनावणीनंतर कंगणाने सोशल मिडियावर प्रतिक्रीया देताना थेट शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेच्या दबावाखाली येऊनच जावेद अख्तर यांनी माझ्यावर खटला दाखल केला असा गंभीर आरोप तिने केला आहे. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा कंगणा विरुद्ध शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कंगणा सोशल मिडियावर सक्रीय असून ती सतत तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तसेच अनेक वादग्रस्त विधानही ती सोशल मिडियाच्या माध्यमातून करत असते. याचकारणास्तव टि्वटरने कंगणाचे अकाऊंट सस्पेंड केलं आहे. पण आता मानहानि खटल्याच्या सुनावणीनंतर कंगणाने Koo अॅपवरून आपली प्रतिक्रीया दिली आहे. तसेच आपला साडीतला फोटोही तिने पोस्ट केला आहे. या फोटोबरोबरच कंगणाने म्हटलं आहे की ‘माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानिचा खटल्याची आज सुनावणी होती. जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली येऊनच हा खटला दाखल केला आहे.’ असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कंगणाच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहे. तसेच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना कंगणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जावेद अख्तर यांनी कंगणावर मानहानिचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी कोर्टाने वारंवार कंगणाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कंगणाने प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे देत न्यायालयात हजर राहणे टाळले होते. मात्र कोर्टाने कंगणाला फटकारले असून २० सप्टेंबरला कोर्टात हजर न राहील्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला होता. यामुळे कंगणाला आज नाईलाजाने कोर्टात हजर राहावे लागले. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणीसाठी १५ नोव्हेंबर तारीख दिली आहे.