Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मी एक राजपूत आहे, मी हाडे मोडते; कंगनाची वादग्रस्त टिपणी

मी एक राजपूत आहे, मी हाडे मोडते; कंगनाची वादग्रस्त टिपणी

कंगनाही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कॉंग्रेसचे आमदार सुखदेव पानसे यांनी तिच्यावर अपमानास्पद टीका केली होती.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट ‘धाकड’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यातच ती सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. यामुळं ही सोशल मीडिया क्विन नेहमीच चर्चेत विषय ठरतेय. अशा परिस्थितीत, तिच्यावर उद्भवणार्‍या प्रत्येक आरोपांवर प्रतिउत्तर देण्यास कंगना तयार असते. ती आतापर्यंत तिच्या रोखठोक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध झाली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार सुखदेव पानसे यांनी शुक्रवारी संध्याकाळी अपमानास्पद टीका केली होती. त्यावर तिने ‘मी हाड मोडणारी राजपूत महिला आहे’ अशी प्रतिक्रिया केली आहे. पानसेंनी त्यांच्या ट्विटमध्ये कंगनाला नाचणारी-गाणारी बाई असे म्हणटले आहे. या टिप्पणीबद्दल आय.ए.एन.एस.च्या ट्वीटच्या आधारे कंगनाने जोरदार प्रतिक्रिया दिली. या प्रतिसादात कंगनाने अनेक बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य केले आहे. आता कंगनाचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कंगना ने ह्या ट्विट मध्ये असे सांगितले आहे की, जो कोणी आहे, त्याला माहित आहे की मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही … तर मी अशी एकुलती एक आहे जीने आइटम नंबर करण्यासाठी नकार दिला. तसेच मोठ-मोठ्या नायकांसोबत(खान/कुमार) चित्रपटात काम करण्यासाठी मी नकार दिला आहे. जिने सर्व बॉलिवूडच्या स्त्रि-पुरुषांना स्वत:च्या विरोधात केले आहे,अशी मी एक राजपूत महिला आहे, मी हाडे मोडते. अशा प्रकारचे वादास्पद प्रतिउत्तर कंगनाने केले आहे.


 

- Advertisement -