घरमुंबई'तुम्ही जनतेचे सेवक आहात महाराष्ट्राचे ठेकेदार नाही'; कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

‘तुम्ही जनतेचे सेवक आहात महाराष्ट्राचे ठेकेदार नाही’; कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Subscribe

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला होता. अशातच आता कंगनाने ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना कंगनाने पीओकेशी केली होती. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्षरित्या कंगनाला पुन्हा सुनावले आहे. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर कंगना रणौतने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असे कंगनाने ट्वीट करत म्हटले असून मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागण्याची असल्याची टीकाही कंगनाने केली आहे.

- Advertisement -

 असं म्हणाली कंगना…

“मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कुणी बनवलं? हे फक्त जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधीही कुणीही होते. लवकरच हे जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागत आहेत?,” तर दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, “मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकांचे सेवक असताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसणाऱ्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. हे घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,” अशी टीकाही कंगनाने केली आहे.

- Advertisement -

दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फैलावर घेतले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक मुंबईला ड्रग्ज हब म्हणत बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी कोणत्याही नावाचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘लोकांना हे माहिती नाही की, गांज्याची शेती कुठे केली जाते.’ यावरही पलटवार करत कंगनाने ठाकरेंना उत्तर दिले आहे.

‘जसे हिमालयाचे सौंदर्य संपूर्ण भारतीयाचे आहे, ठिक त्याचप्रमाणे मुंबई ज्या संधी देते त्या आम्हा सर्वांशी संबंधित आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडून आमचे लोकशाही अधिकार काढून घेण्याचा आणि आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची भाषणं तुमच्या नाकर्तेपणाचे अश्लील प्रदर्शन करतात.’, असे कंगनाने ट्वीट करून म्हटले आहे.


‘तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही’; निलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -