घरताज्या घडामोडीजो न्याय इतरांना तोच कंगनाला, ड्रग्ज घेतले असल्यास चौकशी करा, प्रविण दरेकरांची...

जो न्याय इतरांना तोच कंगनाला, ड्रग्ज घेतले असल्यास चौकशी करा, प्रविण दरेकरांची मागणी!

Subscribe

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं आहे. सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीच्या पथकानं अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. यानंतर आता कंगना जर अमली पदार्थांचे सेवन करत असेल तर तिचीदेखील चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ड्रग्ज प्रकरणात जो न्याय इतरांना तोच न्याय कंगनाला. ती काही या देशाची वेगळी नागरिक नाहीये. कायदा सर्वांनाच सारखा, कुणीही कोणाला पाठीशी घालण्याची गरज नाही. असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण व एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरांच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती दिल्या आहेत, त्यावर समाज समाधानी नाही.

- Advertisement -

एकनाथ खडसे पक्षांतर करणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, एकनाथ खडसे हे जेष्ठ नेते आहेत. त्यांना सन्मान देण्यासाठी केंद्रीय समिती आहे. या विषयावर मी बोलणे उचित नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अंहकाराने ग्रासलेले सरकार

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर कोणाचेही लक्ष नाही. राज्य सरकार आमच्या सूचना लक्षात घेत नाही. सरकारने विरोधी पक्षाला सोबत घेतल्यास आत्तापर्यंत करोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते. पण हे सरकार अंहकाराने ग्रासलेले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – बायको माहेरी गेल्याच्या रागात नवऱ्याने केली सासरे आणि मेव्हणीची हत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -