घरताज्या घडामोडी'माझं घर काही कोवीड १९ हॉटस्पॉट नाही'- नेटकऱ्यांवर करण जोहर भडकला

‘माझं घर काही कोवीड १९ हॉटस्पॉट नाही’- नेटकऱ्यांवर करण जोहर भडकला

Subscribe

चित्रपट निर्माता करण जोहर याच्या पार्ट्यांची नेहमी चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावरही त्याच्या एका पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण करणने नुकतीच त्याच्या घरी काही ठऱाविक सेलिब्रिटीजला पार्टी दिली होती. यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावरून सोशल मीडियावर करणला ट्रोल केलं जात आहे. त्याची इमारतही सील करण्यात आली आहे. यामुळे वैतागलेल्या करणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने माझं घर काही कोवीडचा हॉटस्पॉट नसल्याचं म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये करण म्हणतो ‘की मी, माझे कुटुंब आणि घरातील सर्वच लोकांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. देवाच्या कृपेने आम्ही सगळे निगेटीव्ह आहोत. मी तर दोन वेळा माझी टेस्ट केली. पण दोन्ही वेळा रिपोर्ट निगेटीव्ह आला. शहराच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्यांची मी प्रशंसा करतो. त्यांना माझा सलाम आहे. असं करणने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

तसेच करणने आपली नाराजीही या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. मी मीडियाच्या काही सदस्यांना स्पष्ट सांगतो की ८ लोकांचे एकत्र येणे याला पार्टी  म्हणत नाही. माझ्या घरी कोवीडचे सगळे प्रोटोकॉल पाळले जातात. माझं घर नक्कीच कोवीडचा हॉटस्पॉट नाहीये. आपण सगळेच जबाबदार व्यक्ती आहोत. नेहमीच मास्क वापरतो. कोणीही कोवीड संसर्गाला हलक्यात घेतले नाहीये. मीडियाच्या काही सदस्यांना मी वृत्तांकन करताना थोडातरी संयम ठेवण्याचे आव्हान करतो. सत्यस्थिती जाणून न घेता वृत्तांकन करण्यापासून दूर राहा असेही करणने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्ष झाल्या निमित्ताने गेट टुगेदर ठेवले होते. ज्यात अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. त्यानंतर करिना ,अमृता , सीमा खान आणि महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली. आहे. याच पार्टीतून कोरोनाचा प्रसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात आधी सीमा खानला सर्दी पडसे आणि ताप आला. त्यानंतर करिना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या सगळ्याजणी होम क्वारनटाईन आहेत. करणच्या या पार्टीत एकाची तब्येत बरी नव्हती तो सतत खोकत होता. यामुळे त्यापासूनच सगळ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बॉलीवूडमध्ये चर्चा आहे.

दरम्यान, बीएमसीने कोरोना प्रोटॉकॉलनुसार करिना , करण राहात असलेल्या इमारती सील केल्या असून सर्वांची घर सॅनेटाईज केली आहेत. या सर्व सेलिब्रिटीजच्या प्रकृतीवर बीएमसीचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -