घरताज्या घडामोडीKaran Johar च्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणता मंत्री ? आशिष शेलारांचा सवाल

Karan Johar च्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणता मंत्री ? आशिष शेलारांचा सवाल

Subscribe

करण जोहरच्या पार्टीमध्ये तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करण जोहर यांच्या घरी जी पार्टीमध्ये नेमके किती लोक होते असा सवाल आशिष शेलार केला आहे. या सर्व लोकांची टेस्ट करण्यात आली आहे का ? तसेच या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कोणता मंत्री होता ? याची माहिती सीसीटीव्ही फुटेजने तपासावी अशीही मागणी आशिष शेलार यांनी केला आहे. काही लोकांनी महापालिकेची कोरोना चाचणी केली नसल्याचाही आरोप आशिष शेलार यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सीमा खान, अमृता अरोरा आणि करिना कपुर यांना कोरोनाची लागण झाली. मी महापालिकेला पत्र लिहून याबाबतची माहिती विचारली तसेच मी फोनवरही बोललो. या पार्टीत आठ जणांचा समावेश होता अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पण सीमा खान यांनी माहिती देताना काही नावे लपवल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनीच दिली असल्याचे ते म्हणाले. नंतर करिना कपुरशी चर्चा केल्यानंतर आणखी काही नावे समोर आल्याचेही आशिष शेलार म्हणाले. या पार्टीमध्ये असणाऱ्या काही लोकांनी पालिकेची कोरोना चाचणी न करता हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये चाचणी केल्याचीही माहिती शेलार यांनी यावेळी दिली. या संपूर्ण पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज पालिकेने ताब्यात घ्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ही माहिती पालिकेने द्यावी अन्यथा मंत्र्यांने स्वतःच जाहीर करावे, अशीच मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

मुंबई महापालिका या प्रकरणामध्ये पारदर्शकता दाखवेल, अशी मी अपेक्षा करतो आहे. त्यासाठी महापालिकेने करण जोहरच्या पार्टीचे हॉटेल रिजन्सीच्या परिसरातील फुटेज ताब्यात घ्यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच ड्रायव्हर आणि स्टाफकडूनही या पार्टीबाबतची माहिती घ्यावी. जेणेकरून पार्टीला कोणी हजेरी लावली याचा संशय बळावणार नाही, असेही ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -