Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कर्नाळा बँक घोटाळा तपास ‘ईडी’च्या रडारवर

कर्नाळा बँक घोटाळा तपास ‘ईडी’च्या रडारवर

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील अडचणीत

Related Story

- Advertisement -

सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यानंतर राजाश्रय आणि काही प्रमाणात लोकाश्रय लाभल्याने राजकीय नेते असलेले विविध पक्षातील आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर अटकेची आणि मालमत्ता जप्तीची कारवाई होत नसल्याने हे प्रकरण आता अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) दिले आहे. कर्नाळा बँक घोटाळा तपास ‘ईडी’ च्या रडारवर गेल्याने आता बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे माजी आमदार विवेक पाटील अडचणीत सापडले आहेत.

बँक घोटाळ्यानंतर इतक्या महिन्यात विवेक पाटील यांनी ठेवीदार व खातेदारांची देणी न देता त्यांना वेठीस धरल्याने हे प्रकरण आणखी चिघळले आहे. त्यामुळे आता विवेक पाटील यांची अटक आता निश्चित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

- Advertisement -

पनवेल-उरणसह रायगडातील ५० हजार ठेवीदारांच्या ५२९ कोटींच्या ठेवी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत अडकल्या आहेत. हा घोटाळा एक हजार कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शेकाप नेत्यांच्या राजकीय आणि उद्योग व्यवसायाच्या जडणघडणीत कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे वापरले गेले आहेत. त्याशिवाय बोगस मतदानाकरिता बँकेचे खातेदार असल्याचे ओळखपत्रेही बनविली गेली होती. असे अनेक कांड करून राजकीय नेत्यांनी पद्धतशीर कट रचून कर्नाळा बँक सुरुवातीपासून बुडवली आहे.

५२६ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर आजही अनेक आरोपी जात्यात तर काही सुपात आहेत. काहींनी कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’वर खेटा सुरू केल्या आहेत. गृह आणि सहकार खाते राष्ट्रवादीकडे असल्याने पक्षांतर, अभय मिळवण्याचा प्रयत्नही सुरू आहे. मात्र, ईडीकडे हा तपास गेल्याने एकंदर कर्नाळा प्रकरणाच्या तपासाला आता खर्‍या अर्थाने गती येईल आणि कर्नाळा घोटाळ्याची पाळेमुळे उखडली जातील, अशी आशा आता कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना आहे.

- Advertisement -

सीआयडीने केली वाहने जप्त
पनवेलमधील कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष तसेच शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही खासगी आणि व्यावसायिक स्वरूपाची वाहने जप्त केली.

- Advertisement -