घरमुंबईKarnala bank scam: काय आहे नेमका कर्नाळा बँक घोटाळा? जाणून घ्या सविस्तर

Karnala bank scam: काय आहे नेमका कर्नाळा बँक घोटाळा? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

कर्नाळा नागरी सहकारी बँक ही रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध बँक. मात्र, या बँकेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गैरव्यवहार बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनीच केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता करोडो रूपयांची बेनामी खाती असल्याचे  समोर आले. या प्रकरणालाच कर्नाळा बँक घोटाळा असे म्हटले जाते. जाणून घ्या नेमका काय आहे कर्नाळा बँक घोटाळा?

या बँकेत बेनामी खातेधारकांच्या नावाने खाते उघडून त्यात करोडो रुपयांची कर्जरूपी रक्कम देवून ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये कर्नाळा बँकेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी वळती केल्याचा आऱोपही करण्यात आला होता. दरम्यान, बँकेत झालेल्या या गैरव्यवहार प्रकरणाचा भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपचे पनवलेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. यानंतर परिषद घेत किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी एक पत्रकार घेत आरबीआयच्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचंही म्हटले होते. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

- Advertisement -

असं आहे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण…

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेवीदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार लपवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पुर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे. पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृह खात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुरावा करण्याचा तगादा लावला. त्यानुसार सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पुर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे.

- Advertisement -

सीआयडीचे उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटील यांच्यासह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती. राज्याच्या ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांची भेट घेऊन संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी करून संबंधित घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अखेर अटक करण्यात आली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -