घरमुंबईकर्नाटकाच्या बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र; काँग्रेस नेत्यांकडून धोका

कर्नाटकाच्या बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र; काँग्रेस नेत्यांकडून धोका

Subscribe

कर्नाटकचे बंडखोर आमदार मुंबईतच वास्तव्याला आहेत. काँग्रेसचे आमदारा त्यांच्या मनधरणीसाठी भेटीचे प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना भेटण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहले आहे.

कर्नाटकाचे राजकीय नाट्य काही केल्या कमी होताना दिसत नाही. बंडखोर आमदारांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आपल्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून धोका असल्याचे म्हटले आहे. हे सर्व आमदार मुंबईच्या पवई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकात राजकीय असंतोष आहे. जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात राजकीय भूकंप आला आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांकडून मनधरणीसाठी बरेच प्रयत्न केले जात आहे. परंतु, बंडखोर आमदार भेटीसाठी तयार नाहीत.

काय म्हटले आहे पत्रात?

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्य वाटत नाही. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची इच्छा नाही’. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांपासून आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या लोकांची भेट होण्यापासून थांबवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कर्नाटकी ड्रामा; बंगळुरू व्हाया मुंबई टू दिल्ली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -