घरताज्या घडामोडी'धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय'; करुणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

‘धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय’; करुणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Subscribe

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रेणू शर्मानंतर तिची बहीण व मुंडेची दुसरी पत्नी करुणा यांनीही त्यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रेणू शर्मानंतर तिची बहीण व मुंडेची दुसरी पत्नी करुणा यांनीही त्यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यावर डांबून ठेवले असून आपली १४ वर्षाची मुलगी सुरक्षित नसल्याचे करुणा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

करुणा यांनी बुधवारी ही तक्रार दाखल केली आहे. तीन महिन्यांपासून मुंडेनी आपल्या मुलांना चित्रकूट येथील बंगल्यात लपवून ठेवले असून मला माझ्या मुलांना भेटण्यास परवानगी नाही. २४ जानेवारीला मी मुलांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी मला हाकलून लावले. मुंडे मुलांसमोर अश्लिल चाळे करतात. माझी मुलगी १४ वर्षाची असून ती तिथे सुरक्षित नाहीत असेही करुणाने तक्रारीत म्हटले आहे. तसेच बंगल्यावर महिला कर्मचारी नसल्याचेही सांगत करुणा यांनी उद्या मुलांबरोबर काही अघटीत घडल्यास त्यास मुंडे जबाबदार असतील असा आरोपही केला आहे. मुलांना भेटू न दिल्यास २० फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचा इशाराही करुणा यांनी तक्रारीत दिला आहे. फेसबुकवरही करूणा यांनी यासंदर्भात पोस्ट टाकली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे.

‘आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून मा . उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन) त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही. कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती’.

- Advertisement -

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -