घरमुंबईकेडीएमसीची महासभा अत्रे रंगमंदिरात!

केडीएमसीची महासभा अत्रे रंगमंदिरात!

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून स्वा. विनायक दामोदर सावरकर सभागृहाच काम सुरू आहे. आता हे काम पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने लागणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वा. विनायक दामोदर सावरकर सभागृहाच्या छताचे काम सुरू असल्याने येत्या १४ नोव्हेंबर रोजी होणारी महासभा आचार्य अत्रे रंगमंदिरात होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून छताचे काम सुरू असल्याने पालिकेच्या कासवगती कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाला छताचे काम करण्यासाठी जाग

महापालिकेच्या नव्या इमारतीत चौथ्या मजल्यावर हे सभागृह आहे. १२ जूलै २०१७ रोजी सभागृहाच्या छताचे पीपीओ कोसळले. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी महासभा नव्हती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे छत पडलेल्या अवस्थेत होते. तशाच अवस्थेत महासभा घेतली जात होती. याविषयी प्रसिध्दी माध्यमांनी अनेकवेळा वृत्त प्रकाशित केले होते. अखेर पालिका प्रशासनाला छताचे काम करण्यासाठी जाग आली आहे. सभागृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. साधारण नुतनीकरणाच्या कामासाठी दोन महिने लागणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने येत्या १४ नोव्हेंबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक अशी एकूण १२७ नगरसेवक आहेत. त्यामुळे अत्रे रंगमंदिरात ही सभा घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एमआयडीसी निवासी नागरिकांकडून १० पट मालमत्ता कर आकारणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -