घरमुंबईविकासकामांचा डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

विकासकामांचा डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

Subscribe

महापालिका क्षेत्रात चालू असलेली विविध विकास कामे, मुख्य रस्त्याचे क्राँक्रिटीकरण यामुळे सूक्ष्म धूलिकण, प्रदूषण निर्माण होत आहेत याकडे पयार्वरण अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाहतूक कोंडीतील वाहनांचा धूर , कारखान्यातील वायू आणि विकास कामांमुळे पसरणारे धुलीकण अशा गर्तेत सध्या कल्याण डोंबिवलीकर सापडला आहे. शहरात प्रदूषणाची पातळी वाढल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट ताशेरे ओढले असतानाच  विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुलीकणांचा कल्याण-डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे याकडे केडीएमसीच्या पर्यावरण अहवालातून लक्ष वेधण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात चालू असलेली विविध विकास कामे, मुख्य रस्त्याचे क्राँक्रिटीकरण यामुळे सूक्ष्म धूलिकण, प्रदूषण निर्माण होत आहेत याकडे पयार्वरण अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या धुलीकणांचा नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी सफाई कामगारांसोबातच यांत्रिकी उपकरणांचा प्रभावी वापर करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला यांत्रिकी उपकरणांच्या साधनांचा वापर करावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील ७ ठिकाणांच्या हवेचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तसेच वृक्षतोड, जमिनीची धूप, व माती नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढत असल्याचा संदर्भ नोंदवत त्याचा पर्यावरणावर ताण पडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिकेचे क्षेत्र तिन्ही बाजूनी खडीने वेढलेले आहे. सीआरझेड झोन केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र राज्य व महापालिका यांनी समन्वयाने खाडी संलग्न परिसराचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवली लगतच्या खारफुटीच्या जागेत भराव टाकून बांधकामे करण्यात येत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील वायू प्रदूषणाची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे. तसेच वाढत्या वाहनांमुळे वायू प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या  ७०,१३४ तर चारचाकी वाहने  १४,२४९ आणि ऑटो रिक्षांची संख्या १२,२९८ आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक केांडीतही भर पड आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिक त्रस्त आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -