आता Covid Testing Self Kit विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे मेडिकलवाल्यांना बंधनकारक

मुंबईत कोविड रुग्ण नेमके किती आहेत, याबाबतची अचूक आकडेवारी कोविड चाचणीवरूनच कळते. मात्र सध्या अनेकजण घरच्याघरी मेडिकलवाल्यांकडून 'कोविड टेस्टिंग सेल्फ किट' आणून चाचणी करतात.

keep record of Covid Testing Self Kit sales is mandatory for medical practitioner
keep record of Covid Testing Self Kit sales is mandatory for medical practitioner

मुंबईत कोविड रुग्णांची अचूक आकडेवारी मिळण्यात पालिकेला अडचण येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे काही लोक ‘कोविड टेस्टिंग सेल्फ किट’  (Covid Testing Self Kit ) चा वापर करीत असून त्यातून पॉझिटिव्ह आल्यावर ते त्याबाबत पालिकेला कळवत नाहीत. त्यामुळे आता पालिकेने मेडिकलवाल्यांना ‘कोविड टेस्टिंग सेल्फ किट’ विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक केले आहे. याबाबतची कडक नियमावली पालिकेकडून लवकरच जाहीर करणार आहे.

मुंबईत कोविड रुग्ण नेमके किती आहेत, याबाबतची अचूक आकडेवारी कोविड चाचणीवरूनच कळते. मात्र सध्या अनेकजण घरच्याघरी मेडिकलवाल्यांकडून ‘कोविड टेस्टिंग सेल्फ किट’ आणून चाचणी करतात. मात्र त्या किटची किती प्रमाणात विक्री झाली, त्या किटच्या वापरातून किती जण पॉझिटिव्ह आले याबाबतची अचूक माहिती पालिकेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेला कोविड रुग्णांची अचूक संख्या कळत नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांना व तेथून पुढे मंत्रालयात अगदी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत कोविड चाचण्यांची संख्या, कोविड रुग्ण संख्या, वापरलेल्या कोविड किटची संख्या याबाबतची अचूक माहितीही देता येत नाही.

तसेच, सदर किटचा वापर करणारी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यावर नियमांचे पालन करते की नाही, रुग्णालयात दाखल झाली की नाही याची माहिती पालिकेला मिळत नाही. त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्तक पालिकेने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत कोविड टेस्टिंग सेल्फ किट विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे मेडिकलवाल्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

किटची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून या बेजबाबदारपणे वागणाऱ्या सदर व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. किट खरेदी करणाऱ्या संबंधिताचा संपर्क क्रमांक, पत्ता याची नोंद करून तसा अहवाल तयार ठेवणे पालिकेतर्फे बंधनकारक करण्यात येणार आहे.

नागरिकांना कोविडबाबत संशय दूर करण्यासाठी २५० रुपयांत सेल्फ किट खरेदी करून घरच्या घरी १५ मिनिटांत ही चाचणी करता येते. सेल्फ किटच्या माध्यमातून चाचणी अहवाल नोंद करण्यासाठी ‘मायलॅब’ हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. यामध्ये किटवरील कोड स्कॅन केल्यानंतर काही मिनिटांत प्रिंटेड रिपोर्ट मिळतो. मात्र ही टेस्ट केल्यानंतर अहवाल प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी किटवरील स्कॅनरच्या माध्यमातून नोंद करणे गरजेचे असतानाही त्याकडे सदर नागरिक हे दुर्लक्ष करतात.


हेही वाचा –  Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट