घरमुंबईया वर्षी तारीख लिहिताना होऊ शकतो घोळ!

या वर्षी तारीख लिहिताना होऊ शकतो घोळ!

Subscribe

सोशल मीडियावर देखील या वर्षी दिनांक लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहा... नाहीतर घोळ होईल, या आशयाचा मजकूर गेले काही दिवस फिरत आहे.

वर्ष २०१९ ला निरोप देऊन वर्ष २०२० चं आपण काही तासांपूर्वीच जंगी स्वागत केलं. ट्वेन्टी-ट्वेन्टी असणाऱ्या या वर्षात तारीख लिहिताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अन्यथा घोळ होऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर देखील या वर्षी दिनांक लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहा… नाहीतर घोळ होईल, या आशयाचा मजकूर गेले काही दिवस फिरत आहे.

या वर्षी तारीख लिहिताना काळजी का घ्यावी?

वर्ष २००१ ते २०१९ पर्यंत आपण आपल्या व्यवहारी जीवनात तसेच इतर ठिकाणी दिनांक लिहिताना सर्रासपणे शॉर्टकटचा वापर करत होतो. तो ग्राह्य सुद्धा धरला जात होता. उदाहरणार्थ कालची तारीख घेतल्यास आपण ३१/१२/१९ असे लिहीत होतो. पण या वर्षी तारीख लिहीताना विशेषतः व्यवहारात शॉर्टकट लिहिणे टाळायला हवे. अन्यथा फसवणूक, गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच नवीन सवय अंगी बाणवूया. आणि तारीख लिहिताना ती पूर्ण लिहूया.

- Advertisement -

या बाबतीत तारीख लिहिताना काळजी घ्या

नोकरदार वर्गासह व्यापारी, व्यावसायिकांनी या वर्षी तारीख लिहिताना काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा तारीख लिहिताना शक्यतो पूर्ण लिहावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेचे व्यवहार करताना प्रत्येकानेच या बाबतीत काळजी घ्यावी.

हेही वाचा – कोरेगाव भीमा विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अभिवादन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -