घरमुंबईखुशखबर! सार्वजनिक हॉस्पिटलच्या यादीत केईएम पुन्हा अव्वल

खुशखबर! सार्वजनिक हॉस्पिटलच्या यादीत केईएम पुन्हा अव्वल

Subscribe

भारतातील उत्कृष्ट सरकारी हॉस्पिटलच्या यादीत केईएम हॉस्पिटची नोंद करण्यात आली आहे. 'द वीक हंसा' रिसर्च सर्व्हे २०१९ मध्ये केईएम हॉस्पिटल हे पाचव्या क्रमाकांवर आहे.

सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये असणारी गर्दी सर्वश्रुत आहे. तरीही, या सर्व परिस्थितीवर मात करत सार्वजनिक हॉस्पिटलच्या यादीतील सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये केईएम हॉस्पिटलची नोंद करण्यात आली आहे. तसंच, देशातील उत्कृष्ट हॉस्पिटलच्या यादीत केईएमची नोंद करण्यात आली आहे. चकचकीत इमारती, व्यक्तिगत रुग्णसेवा, अत्याधुनिक उपकरणांच्या स्पर्धेत आजही खासगी हॉस्पिटल्सची चर्चा असते. पण, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलने ही प्रथा मोडित काढत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

केईएम हॉस्पिटल हे वैद्यकीय महाविद्यालय असून रुग्णसेवेचे शिक्षण दिले जाते

भारतातील उत्कृष्ट सरकारी हॉस्पिटलच्या यादीत केईएम पाचव्या क्रमांकांवर असल्याची नोंद ‘द वीक हंसा’ रिसर्च सर्व्हे २०१९ कडून करण्यात आली आहे. या माहितीनुसार, पहिल्या दोन क्रमांकावर देखील सरकारी हॉस्पिटल आहेत. मात्र, या हॉस्पिटलला केंद्रांकडून अनुदान मिळतो. शिवाय, हे अनुदान पालिका किंवा राज्य सरकारच्या अनुदानापेक्षा अधिक असते. केईएम मात्र पालिका आणि राज्य सरकारच्या निधीवर चालत असूनही उत्कृष्ट सरकारी हॉस्पिटलच्या पहिल्या पाचमध्ये आहे. सरकारी हॉस्पिटलसोबत इतर येणारी खासगी हॉस्पिटलमध्ये कार्पोरेटर असली तरीही अशांमध्ये निव्वळ हॉस्पिटल आहेत. पण, केईएम हॉस्पिटल हे वैद्यकीय महाविद्यालय असून रुग्णसेवेचे शिक्षण दिले जात असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

केईएम रुग्णालयात १८०० खाटा आहेत

केईएम रुग्णालयाची स्थापना १९२६ वर्षी झाली. सार्वनिक रुग्णालयामधील केईएमचे नियंत्रण मुंबई महानगरपलिका करत आहे. या रुग्णालयात १८०० खाटा आहेत. ३९० फिजिशयन डॉक्टर असून ५५० निवासी डॉक्टर आहेत. या रुग्णालयात १.८ मिलियन बाह्यरुग्ण तर अंतःरुग्णलयामध्ये ७८ हजार रुग्णांची काळजी घेण्यात येते. रुग्णालयाला लागूनच सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय आहे.

“ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. हॉस्पिटलधील फॅकल्टी आणि सर्वांच्या कामाचे हे चीज आहे. सार्वजनिक रुग्णसेवेतील सरकारी हॉस्पिटल म्हणून केईएमचे नाव उत्कृष्टतेच्या यादीत राहणे फार महत्वाचे आहे.” – डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता , केईएम रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -