घरताज्या घडामोडीके. ई. एम.च्या गरीब रुग्ण सहाय्यता निधीतील घोटाळ्याची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

के. ई. एम.च्या गरीब रुग्ण सहाय्यता निधीतील घोटाळ्याची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात गरीब रुग्ण सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात गरीब रुग्ण सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र या प्रकरणात रूग्णालय प्रशासन पोलिसांना तपासकार्यात सहकार्य करीत नसल्याने एखाद्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत खात्यांतर्गत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. (KEM Investigate scam in Hospital Poor Patient Assistance Fund demands of Congress)

मुंबई महापालिकेच्या के. ई. एम. रूग्णालयात गरीब रूग्णांच्या मदतीसाठी गरीब रुग्ण सहाय्यता निधीची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये विविध माध्यमांतून कोट्यवधी रूपयांचा निधी जमा होतो. या निधीमधून गरजू रुग्णांना औषधोपचार, मोठ्या शस्त्रक्रिया करणे यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. मात्र गरीब रुग्णांसाठीच्या या निधीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

- Advertisement -

२०१७ पासूनच्या जुन्या केसेसमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून या निधीवर डल्ला मारला गेलाय. यासाठी डिन, डेप्युटी डिन, एएमओ आणि युनिट हेड यांच्या बोगस सह्या आणि बोगस स्टॅम्प तयार करण्यात आले. केवळ एका नोंदवहीत ६५ लाखांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. उर्वरीत नोंदवहीतील व्यवहारांची कसून चौकशी केल्यास आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर येवू शकतो, अशी शक्यता रवी राजा यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

मोठे मासे पकडले पाहिजेत

- Advertisement -

या निधी घोटाळ्याप्रकरणी संबंधित विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचारी सोनाली गायकवाड यांना अटक झाली आहे. परंतु घोटाळ्याची व्याप्ती पाहता केवळ एक कंत्राटी कर्मचारी हा घोटाळा करू शकत नाही. त्यामुळे या घोटाळ्यातील आणखीन मोठे मासे गळाला लागले पाहिजेत. सोनाली गायकवाड हिला सदर घोटाळ्यात मदत करणाऱ्यांची नावेही समोर येणं गरजेचे आहे. परंतु के. ई. एम. प्रशासन पोलिसांना तपास कार्यात मदत करत नसल्याचे समजते. त्यामुळे सदर प्रकरणात के. ई. एम. रूग्णालयातील इतर कर्मचारी व अन्य कोणी वरिष्ठ सामील असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिका-याच्या देखरेखीखाली खांत्यार्गत सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस तपासही योग्य दिशेने आणि तात्काळ होण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेशही आपण के. ई. एम. प्रशासनाला द्यावेत. गरीब रूग्णांसाठीच्या निधी वाटप व्यवहारात पारदर्शकता यावी, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – सरकारने एसटीचे ६०० कोटी थकवले; काँग्रेसचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -