घरमुंबईआव्हाडांवर विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे नोंदवा; केतकी चितळेचं वकिलामार्फत पोलिसांना पत्र

आव्हाडांवर विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे नोंदवा; केतकी चितळेचं वकिलामार्फत पोलिसांना पत्र

Subscribe

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. मात्र आपल्यावरील लावलेली कलमं चुकीचे असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. या वादात आता अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली आहे. तिने आव्हाडांवर गंभीर कलम लावण्याची मागणी केली आहे. केतकी चितळेने वकिलांमार्फत पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने आव्हाडांवर विनयभंगाच्या कलमासह गंभीर कलम लावण्याची मागणी केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आव्हाड म्हणाले की, सुरुवातीला पोलिसांनी लावलेली कलमे ही जामिनपात्र गुन्हे होते. त्यानंतर आणखी काही कलमांतंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले, ज्यावरून सरकारची दडपशाही समोर आल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणी प्रकरणी जे कलम लावण्यात आले आहेत, ते लगेच जामीन मिळतील असे कलम लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही, विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले, असा आरोप केतकी चितळेने केला आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचे कलम लावा अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.

सामूहिकरित्या हा हल्ल झालाय, त्यामुळे एक कट रचला गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे विनयभंगाचं कलम पोलिसांनी का लावलं नाही असा सवालही केतकीच्या वकिलांनी पोलिसांना पत्राद्वारे केला आहे.


हेही वाचा : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आदित्य ठाकरेंची साथ; हिंगोलीत दोघांचा पायी प्रवास

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -