घरमुंबईखार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरुद्ध दाखल केले आरोपपत्र

खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरुद्ध दाखल केले आरोपपत्र

Subscribe

मुंबईच्या खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्य विरुद्ध हनुमान चालिसा प्रकरणात कलम 353 आणि 34 अंतर्गत 5 आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना नोटीस दिली होती. या नोटीसमध्ये त्यांच्या विरोधात IPC कलम 353, 34 नुसार चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांनी आज (बुधवार) सकाळी 11 वाजता ब्रांद्रा न्यायालयात हजर रहावे असे म्हटेल होते. दरम्यान बोरीवली न्यायालयाने आज या जोडप्याला वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली असून पुढील सुनावणी 16 जूनला आहे.

- Advertisement -

काय आहे कलम 353 आणि 34 –

कलम 353 मध्ये एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे किंवा त्याच्या कर्तव्यात गुन्हेगारी मार्गाने अडथळा आणणे समाविष्ट आहे, तर कलम 34 अंतर्गत त्याच उद्देशाने एखाद्या गटाने केलेले गुन्हेगारी कृत्य येते. या दोन कलमान्वये राणा पती-पत्नीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

आमरावती मध्ये 4 गुन्हे दाखल –

यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावतीमध्ये रास्ता रोको केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा पहिल्यांदाच अमरावतीत गेले होतो. त्यावेळी रस्त्यावर स्टेज बनवून रात्री उशिरा लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. नवनीत राणा यांच्या 14 समर्थकांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अमरावतीच्या चार पोलिस ठाण्यांमध्ये कलम १४३, ३४१, 291 आणि 135 अन्वये वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, परवानगीशिवाय रॅली काढणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -