घरमुंबईदिलदारपणा : मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला दिले 1500 कोटींचं घर गिफ्ट

दिलदारपणा : मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला दिले 1500 कोटींचं घर गिफ्ट

Subscribe

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याकडे प्रचंड बँक बॅलन्स असला तरी त्यांचे हृदयही मोठे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला भेट म्हणून घर दिले आहे. या घराची किंमत पाहली तर सामान्य लोकांचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही.

सध्याच्या काळात महागाई वाढल्यामुळे घर घेणे सामान्य माणसाचे स्वप्नच राहिले आहे. असे असतानाही मुकेश अंबानी यांनी त्यांच्या जुन्या कर्मचार्‍यासाठी तब्बल 1500 कोटी रुपयांचे घर विकत घेतल्याचे समोर आले आहे. रिलायन्ससाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या आणि मुकेश अंबानी यांचा मित्र असलेल्या मनोज मोदी (Manoj Modi) यांना त्यांनी 22 मजली इमारत भेट म्हणून दिली आहे. रिलायन्स कंपनीच्या स्थापनेपासूनच मनोज मोदी अंबानींच्या सोबत आहेत.

- Advertisement -

अंबानी कुटुंब मोदींच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात
अंबानींच्या सर्वात जवळचे कर्मचारी आणि उजवा हात म्हणून मनोज मोदींना लोक ओळखतात. रिलायन्सच्या सर्व व्यवहारांच्या यशामागे त्यांचा हात आहे. वर्षानुवर्षे ते कंपनीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. केवळ मुकेश अंबानीच नाही तर त्यांची मुले (आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी) मनोज मोदींच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अंबानी कुटुंबाने त्यांना एक अनमोल भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंबानी कुटुंबाने त्यांच्या जुन्या कर्मचाऱ्यांसाठी आणि मित्रांसाठी मुंबईतील पॉश भागात 22 मजली इमारत खरेदी केली आहे.

22 मजली इमारत भेट दिली
अंबानी कुटुंबाने मुंबईच्या पॉश भागातील नेपियन सी रोडवर 22 मजली इमारत खरेदी केली आहे. ही इमारत १.७ लाख स्क्वेअर फूट जागेवर बांधली गेली आहे. या इमारतीला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. इमारतीचे सुरुवातीचे ७ मजले पार्किंगसाठी वापरले जाणार आहेत. घरातील बहुतेक फर्निचर इटलीमधून आयात केले गेले आहेत. वृत्तानुसार, घर मिळाल्यानंतर मनोज यांनी मुंबईतील 41.5 कोटी रुपयांचे 2 फ्लॅट विकले आहेत.

- Advertisement -

अंबानी आणि मोदी दोघेही वर्गमित्र
मनोज मोदींना मुकेश अंबानींचा उजवा हात म्हटले जाते. हे दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनी विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण पूर्ण केले आहे. अभ्यासानंतर जेव्हा मुकेश अंबानी रिलायन्समध्ये काम करू लागले तेव्हा त्यांनी मनोज यांनाही आपल्यासोबत काम करण्यास बोलावून घेतले. मनोज मोदी 1980 पासून रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत. व्यवसायातच नव्हे तर अंबानी कुटुंबातही त्यांना आदर दिला जातो. रिलायन्सच्या यशामागे त्याची कल्पना असल्याचेही बोलले जाते.

कंपनीमध्ये सीईओ इतकाच त्यांना अधिकार
मनोज मोदी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे साईओ आहेत. ते लाइमलाइटपासून दूर राहायला आवडते, त्यामुळे त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंटदेखील नाही आहे. कंपनीमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे. हजीरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, फर्स्ट टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल आणि 4जी रोलआउट यासारख्या विविध प्रकल्पांशी ते जोडलेले आहेत. कंपनीमध्ये सीईओ इतकाच त्यांना अधिकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -