उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार – किरीट सोमय्या

Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंना दोनच गाल आहेत. ते तरी किती चपराक खाणार. त्यांचे ठाकरेंचे दोन्ही गाल सूजले आहेत, अशी खोचक टीका कीरीट सोय्या यांनी केली. सुप्रीम कोर्टानं काल राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती दिली आहे. यावर उद्धव ठाकरे सरकार आणखी किती चपराक खाणार, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पोलीस कमीशन संजय पांडे यांचा वापर उद्ध ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे गाल दोनच. कधी कनिष्ठ, सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तर कधी सुप्रीम कोर्ट किती चपराक मारणार, त्यांचे गाल पाहिले, किती सूजले आहेत. आता ते माफिया पोलीस कमीशनर कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल सुप्रीम कोर्टाला जाब विचारा. राजद्रोहाचे कलम सुप्रीम कोर्टाने निरस्त केले. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे पोलीस प्रशासानाचा वापर माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार. खासदार आणि आमदारांना धमकी देतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा करतात. ही भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. मी गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान हिंदुस्थानचे करोडो लोक रामभक्त हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त जेव्हा रावण पैदा होतात, त्याच्या लंकेला जाळूनच टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा बंद करावी, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.