संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला, किरीट सोमय्यांचा आरोप

Kirit Somaiya has accused Sanjay Raut of violating the code of conduct

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आहे. या निडणुकीत संजय पवारांच्या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेत त्यांनी आम्हाला मते दिली नाहीत, असा आरोप केला. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला असून राऊतांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी भाजपला मतदान करणार अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या 6 आमदारांची नावे उघड केली आहेत. ही कृती गोपनीयतेचा भंगे नव्हे का? मी निवडणूक आयोगाला विनंती करतो निवडणून आचारसंहितेचा भंग करण्याच्या प्रकारणाची योग्य दखल घ्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते –

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर संजय राऊत यांनी भाजपाला मतदान करणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची नावे घेत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. बाजारातले काही घोडे विकले गेले. मला वाटतंय जास्त बोली लागली. किंवा इतर काही कारणे असतील. त्यामुळे आमची अपक्षांची ६ मतं आम्हाला मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष, छोटे पक्ष यांचे एकही मत फुटले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर किंवा इतर अशी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळवू शकली नाहीत. आम्ही व्यापार न करताही संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली हाही आमचा विजयच आहे, असे राऊत म्हणाले होते.