घरताज्या घडामोडीमहापालिका आयुक्तांवर कारवाई करा; किरीट सोमय्यांची मागणी

महापालिका आयुक्तांवर कारवाई करा; किरीट सोमय्यांची मागणी

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यावर कारवाई करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणखीन एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ‘उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त चहल यांनी कोविडच्या नावाने मुंबईत ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने तब्बल २ हजार १०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे नियोजन केले होते. स्वत:च्या परिचित बिल्डरची मुलुंड येथील जमीन जी मूळ राज्य सरकारच्या मालकीची आहे ती २ हजार १०० कोटी रुपये देऊन विकत घ्यायची’, असे षडयंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सुरु केले. किरीट सोमय्या यांनी एका पत्रकार परिषदेद्वारा ठाकरे सरकारच्या या घोटाळाचा खुलासा केला आहे. त्यामुळे दोषी कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, असा प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

१२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प

‘मुलुंड पूर्व मधील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची जमीन ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचे मुंबई महापालिकेच्या कमिटीने रिपोर्टमध्ये स्पष्ट केले. ही जमीन आयुक्तांनी रुपये २ हजार १०० कोटींमध्ये विकत घेण्याचे निर्देशही दिले. आयुक्तांच्या निदर्शनाला खाली या कमिटीने स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची ही जमीन ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलसाठी उचित असल्याचा रिपोर्ट आणि निर्णय दिला. ती जमीन घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलसाठी २ हजार १०० कोटी रुपयांची जमीन आणि ९ हजार ५०० कोटी रुपयांचे बांधकाम, हॉस्पिटलचे साहित्य आणि त्या सोबतचे कन्व्हेन्शन सेंटर, असे मिळून एकंदर १२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई महापालिका आयुक्तांनी गैरकायदेशीररित्या पुढे सरकवला’.

- Advertisement -

५ हजार खाटांच्या हॉस्पिटलचा निर्णय

या घोटाळ्याच्या विरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना किरीट सोमय्यांनी ३० ऑक्टोबर मध्ये एक तक्रार याचिका दिली. माननीय राज्यपाल यांनी ही याचिका महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तपासासाठी पाठविली. आश्चर्याची बाब कॉंग्रेस पक्षाचे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा घोटाळा थांबवावा’, असे आवाहन ही केले होते. अशा ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलचा निर्णय कोणाचा हे एक गूढ रहस्यच आहे.

‘मुंबई महापालिका, आरोग्य मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, कोविड टास्क फोर्स, नगर विकास मंत्रालय अश्या सगळ्याच विभागांनी हा निर्णय आमचा नाही, आम्ही असे हॉस्पिटल बांधण्याची शिफारस केलेली नाही’, असे स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या परिचित बिल्डरशी व्यवहार

मुंबई महापालिकेने आमच्या एका माहिती अधिकार अर्जाच्या अंतर्गत कळवले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० जुलै २०२० रोजी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या “कानात” (खासगीत) ही गोष्ट सांगितली आणि म्हणून महापालिका आयुक्तांनी सगळे नियम धाब्यावर बसून ४ दिवसात मुलुंड येथील मुख्यमंत्र्यांच्या परिचित बिल्डरची स्वास कन्स्ट्रक्शनची जमीन या ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलसाठी हस्तगत करण्याचा उपक्रम सुरु केला.

आयुक्त चहल यांनी ही ६ ऑक्टोबर २०२० रोजी राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना अहवाल सादर केला आणि ५ हजार खाटांचे हॉस्पिटल कसे आवश्यक आहे. त्यासाठी मुलुंड येथील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनी अत्यंत योग्य आहे, तिथे हॉस्पिटल उभे करावे. त्यासाठी मुंबई महापालिकेनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे अहवाल पाठवले.

ठाकरे सरकारनी महापालिकेचा अहवाल (रिपोर्ट) हातात घेवून स्वास बिल्डरकडून जमीन विकत घेण्याची प्रक्रिया ही सुरु केली यासाठी नगरविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जलदगतीने कार्यवाही सुरु केली. १० डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनी मुंबई महापालिकेकडून ही जागा संपादित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे मदत मागितली. दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने हा १२ हजार कोटी रुपयांचा हॉस्पिटल घोटाळा करत आहेत, असे सगळे पुरावे आम्ही लोकायुक्तांना दिल्यानंतर आता मुंबई महापालिकेने राज्य सरकारला एक अहवाल पाठवला आहे.

‘५ हजार खाटांच्या हॉस्पिटलकरिता मुंबई महापालिकेकडून कोणतीही जागा निश्चित करण्यात आलेली नाही महापालिकेनी या संदर्भात जमीन निश्चित करण्याची जी प्रक्रिया केली होती ती आता आम्ही रद्द केली आहे. आमचे या आधिचे सगळे रिपोर्ट रद्द समजावे’. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांचा ५ हजार खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने २ हजार १०० कोटींचा जमीन घोटाळा बारगळला.


हेही वाचा – ‘सरकार राऊतला नोकरी देऊ शकत नसेल, तर काहीतरी गडबड आहे’


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -