घरमुंबईकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर अनिल परबांचा नंबर, किरीट सोमय्यांचा इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर अनिल परबांचा नंबर, किरीट सोमय्यांचा इशारा

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी तीन वेळा ईडी चौकशी झाली. त्यांना चौथ्यांदा ईडी समोर जावे लागणार आहे. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परबा यांचा नंबर आहे. ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याबाब त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी परबांना जावेच लागणार आहे, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

अनिल परब यांच्या बद्दल किरीट सोमय्या म्हणाले  –

- Advertisement -

अनिल परबांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, परबांना भीती वाटत असली तरीही ईडीचा बुलावा आला असेल तर जावेच लागणार आहे. चौकशीसाठी बोलावले तर परबांना भीती वाटतेय. गेल्यानंतर काय होणार, हे अनिल देशमुखांनाच विचारा, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

राहुल गांधींवर आरोप – 

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी, उद्धव ठाकरे २४ महिन्यात लुटण्याचे काम करत आहेत. काँग्रेसने ७० वर्ष हे काम केले आहे. काँग्रेसचा एकही नेता हे का नाही सांगत की मीडियाच्या नावाने घेतलेला प्लॉट फक्त ५० लाखात राहुल गांधी, सोनिया गांधींच्या कंपनीला दिला. ज्याचे बाजारमूल्य आज ४०० कोटी रुपयेहून अधिक आहे. हजार कोटी रुपयेही होऊ शकते. जनतेची जमीन ५० लाखात घ्यायची आणि आपल्या कंपनीत ट्रान्सफर करायची, याचे उत्तर द्यावंच लागणार, असा आरोप राहुल गांधींवर केला.

कारवाई सूचक इशारा  –

राहुल गांधी, अनिल परब यानंतर आता किरीट सोमय्या कुणाचं नाव घेणार, कुणाचा घोटाळा उघड करणार, याविषयी चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी सूचक वक्तव्य केलं. यानंतर काय होईल, हे सोमवारी कळेलच, असं ते म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -