कोरोना केंद्र शिवसेना नेत्यांच्या कमाईचे साधन, किरीट सोमय्यांचा आरोप

मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील सहा कोविड सेंटरचे फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे. मी पुढच्या आठवड्यात मुंबईच्या महापौर आणि कोविड सेंटरमधील कमाई उघड करणार आहे.

Kirit Somaiya Slams shiv sena on mumbai covid centre

कोरोना केंद्र शिवसेना नेत्यांच्या कमाईचे साधन ठरली असून वरळीतील कोविड सेंटरचे काम महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील सहा कोविड सेंटरचे फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे. मी पुढच्या आठवड्यात मुंबईच्या महापौर आणि कोविड सेंटरमधील कमाई उघड करणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट मिळाले आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिले गेले, असा दावाही सोमय्या यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेल्या नेत्यालाही अशाच पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले आहे. त्याची कागदपत्रे जनतेसमोर ठेवणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. शिवसेना नेत्यांना आणि ठाकरे सरकारसाठी कोविड हे कमाईचे साधन आहे आणि म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ लॉकडाऊनबद्दल ते बोलत असतात, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. दरम्यान,किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना गांजा पिऊन आरोप केला जात असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू