घरमुंबईरवींद्र वायकरांनी पालिकेची जागा गिळंकृत केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

रवींद्र वायकरांनी पालिकेची जागा गिळंकृत केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Subscribe

मुंबई : अलिबागला १९ बंगले घोटाळा करणारे उद्धव ठाकरे यांचे जोडीदार रवींद्र वायकर यांची नवीन घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जोगेश्वर विक्रोळी लिंक रोडवरील २ लाख स्वे. फुट असलेले मुंबई महापालिकेच्या मालकीचे लहान मुलांचे मैदान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने रविंद्र वायकरांनी गिळंकृत केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

जोगेश्वर विक्रोळी लिंक रोड येथील कमाल अमरोली स्टुडिओची जागा अविनाश भोसले शहीद बलवा कंपनीने रवींद्र वायकरांसोबत मिळून २००९ मध्ये या जागेचा आरजी फ्लॉट विकत घेतला. या फ्लॉटमधील ३३ टक्के जागेवर स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर बनवायच्या नावाखाली भव्य फाईव्हस्टार क्लब बनवून वायकरांनी ते पैसे बँकेकडून वसूल केले आणि २ तुतीयांश जागा ही खुल्या मैदानासाठी पालिकेच्या ताब्यात देण्याची कागदावर प्रक्रिया करण्यात आली. २०१९-२१ मध्ये पुन्हा एकदा ठाकरे सरकार आल्यानंतर रवींद्र वायकरांनी महापालिकेला दिलेल्या २ तुतीयांश जागेवर फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी मागितली आणि जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंनी महापालिकेची जागा ही रवींद्र वायकरांची जागा आहे असे भासवून त्यांना परवानगी दिली. आज तिथे हॉटेलचे बांधकाम जोरात सुरू आहे. या घोटाळ्याबाबत मी गेली दीड वर्षे बोंबाबोंब करत होतो. अखेर फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेने दखल घेतली आणि ८ फेब्रुवारीला महिपालिकेने रवींद्र वायकरांना नोटीस पाठवली. या चीटींग प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने मला आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

लहान मुलांचे मैदान असलेली मुंबई महापालिकेची जागा बळकावणाऱ्या रवींद्र वायकरांवर आदित्य ठाकरे आता गप्प का आहेत. तसेच पर्यावरणाच्या नावाने ज्यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली असे उद्धव ठाकरेही आता गप्प का आहेत, असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, रवींद्र वायकर आणि त्यांना मदत करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करावा. या संबंधीत आरोपींवर ४२०, ४६७, ४६८ आय़पी सेंशन ३४ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -