घरताज्या घडामोडीतुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, किरीट सोमैय्या यांचे प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर

तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, किरीट सोमैय्या यांचे प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर

Subscribe

प्रताप सरनाईक यांनी रीतसर प्रक्रिया पुर्ण करुन माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याविरोधात दावा दाखल केला

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावर किरीट सोमैय्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुमच्या मानहानीच्या धमक्याना आम्ही घाबरणार नाही असा इशारा किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होते की, जर किरीट सोमैय्या यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात दावा दाखल करण्यात येईल त्यानुसार सरनाईक यांनी दावा दाखल केला आहे.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय. किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे की, चोराच्या उलट्या बोंबा, आमदार प्रताप सरनाईकांनी NSEL घोटाळ्यातून टिटवाळा येथे ७८ एकर जमिन घेतली त्याची कारवाई सुरु असून जमिन जप्त करण्यात आली आहे. एमएमआरडीए सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट कमिशन घोटाळ्यात ED चौकशी करत आहे. ठाणे विहंग गार्डनचे अनेक मजले अनधिकृत या विषयात लोकायुक्त द्वारा सुनावणी सुरु झालेली आहे. तुम्ही आमच्यावर दावा दाखल करण्याच्या धमक्या दिल्याने आम्ही थांबणार किंवा घाबरणार नाही आहोत. असा इशारा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी प्रताप सरानाईक यांना दिला आहे.

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्यावर १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे. सरनाईक यांनी यापुर्वीच सांगितले होते की, किरीट सोमैय्या यांनी मागील काळात खोटी कागदपत्रे दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमैय्या यांनी केलेल्या खोट्या विधानांबाबत माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल त्यानुसार ठाणे कोर्टात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांनी रीतसर प्रक्रिया पुर्ण करुन माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे.

- Advertisement -

किरीट सोमैय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी डिसेंबर २०२० मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधली असल्याचा आरोप केला आहे. सरनाईक यांनी बांधलेल्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. तसेच ही इमारत अनधिकृत आहे. यावर किरीट सोमैय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच एमएमआरडीएमध्ये बोगस टॉप्स सुरक्षारक्षकांची निम्मी रक्कम ही आमदार प्रताप सरनाईक यांना जात असल्याचा आरोपही प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला आहे. कल्याण तालुक्यातील ७८ एकर जमीन खरेदी केल्याचा व्यवहार केला आहे. तसेच त्यावर ईडीची जप्ती असूनही व्यवहार पुढे सुरुच असल्याचा आरोपही किरीट सोमैय्यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -